मुंबई – गुजराती टीव्ही मालिकांमध्ये काम करणाऱ्या एका अभिनेत्रीच्या (Gujarati TV serial Actress) १४ वर्षीय मुलाने ५७व्या मजल्यावरून उडी मारून आत्महत्या (Suicide) केली. ही घटना ही घटना कांदिवलीच्या ‘सी ब्रूक’ इमारतीत घडली. मुलाने ट्युशनला जाण्यास नकार दिल्यानंतर देखील आईने त्याला ट्यूशनला जाण्यास सांगितल्याने सदरील मुलाने रागाच्या भरात हे कृत्य केल्याचे सांगितले जात आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार गुजराती टीव्ही मालिकांमध्ये काम करणारी ही अभिनेत्री तिच्या पती आणि मुलासोबत येथे राहत होती. तिने तिच्या मुलाला ट्युशन क्लासला जाण्यास सांगितले होते. परंतु मुलाने ट्युशनला जाण्यास नकार दिला. यावरून आई आणि मुलामध्ये वाद झाला. यानंतर अल्पवयीन मुलाने रागाच्या भरात इमारतीच्या ५७ व्या मजल्यावर उडी मारली. एवढ्या उंचीवरून पडल्याने त्याचा जागीच मृत्यू झाला. सुरक्षा रक्षकाने घटनेची माहिती पोलिसांना दिल्यानंतर कांदिवली पोलिसांनी घटनास्थळी जाऊन पंचनामा केला आणि मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवला. पोलिसांनी सदर प्रकरणी अपघाती मृत्यूची नोंद केली असून आत्महत्येमागील नेमके कारण शोधण्याचा प्रयत्न सुरू आहे. घटनास्थळाजवळील सीसीटीव्ही फुटेजची तपासणी केली जात आहे.