रिंगणगावात १४ वर्षीय मुलाची हत्या ! दोन आरोपींना अटक

Tejas Mahajan Murder Case

जळगाव – एरंडोल तालुक्यातील रिंगणगाव येथील १४ वर्षीय तेजस गजानन महाजन (Tejas Gajanan Mahajan)याच्या खूनप्रकरणी फरार असलेल्या दोन आरोपींना स्थानिक गुन्हे शाखेने (Crime Branch) अटक केली . १६ जून रोजी आरोपींनी तेजसची हत्या केली होती.

तेजस आपल्या आई-वडील आणि बहिणीसोबत रिंगणगावात राहत होता. त्याचे वडील शेतीसोबतच हार्डवेअर दुकान चालवतात. १६ जून संध्याकाळपासून तेजस घरी न आल्याने कुटुंबीयांनी एरंडोल पोलीस ठाण्यात अपहरणाची तक्रार दाखल केली. दुसऱ्या दिवशी सकाळी गावाशेजारील काटेरी झुडपात तेजसचा मृतदेह आढळून आला. त्याच्या गळ्यावर वार केल्याचे दिसत होते. ग्रामस्थांच्या आक्रोशानंतर पोलिसांनी तपासाची चक्रे फिरवली आणि मृतदेह मिळालेल्या शेताजवळ मध्यप्रदेशातील खरगोन (Khargone district in Madhya Pradesh)परिसरातून शेतीकामासाठी आलेल्या काही कुटुंबांकडे चौकशी सुरू केली.त्यातून हरदास वास्कले व त्याचा शेजारी सुरेश खरते हे दोघे संशयाच्या भोवऱ्यात आले. लग्नासाठी दोघे मालकांना न सांगता शेत सोडून गेले होते, ज्यामुळे पोलिसांचा संशय अधिक बळावला.स्थानिक गुन्हे शाखेच्या तीन पथकांनी महाराष्ट्र-मध्यप्रदेश सीमावर्ती भागात नाकाबंदी (checkpoints) केली. यावेळी हरदास वास्कले मोटारसायकलवरून (motorcycle)जाताना आढळून आला पोलिसांनी त्याला शिताफीने अटक (arrest)केली. चौकशीत त्याने गुन्ह्याची कबुली दिली.
हरदास वास्कलेने चौकशीत सांगितले की, सुरेश खरते आणि गावातील रिचडीया कटोले हे गावात फिरत होते. तेव्हा तेजसला सुरेशचा धक्का लागला. त्यावरून सुरेशने तेजसला शिवीगाळ केली. तेजसने विरोध करताच तिघांनी त्याला मारहाण केली. रिचडीया कटोले याने त्याच्याकडील चाकूने तेजसच्या गळ्यावर वार केले त्यात तो ठार झाला. तेजसला उचलून सुरेशने खांद्यावर नेले आणि झोपड्यांच्या बाजूला असलेल्या शेतात काटेरी झुडपात फेकला.