Home / महाराष्ट्र / Shivsena MNS Alliance :उबाठा-मनसेत बैठकांचे सत्र!शरद पवारांनाही युतीत घेणार?

Shivsena MNS Alliance :उबाठा-मनसेत बैठकांचे सत्र!शरद पवारांनाही युतीत घेणार?

Shivsena MNS Alliance -स्थानिक स्वराज्य संघटनांच्या निवडणुकांसाठी उबाठा आणि मनसे युती (Shivsena MNS Alliance ) होण्यासाठी आता पडद्यामागे जोरदार हालचाली...

By: Team Navakal
raj thakare uddhav thakre sharad pawar

Shivsena MNS Alliance -स्थानिक स्वराज्य संघटनांच्या निवडणुकांसाठी उबाठा आणि मनसे युती (Shivsena MNS Alliance ) होण्यासाठी आता पडद्यामागे जोरदार हालचाली सुरू झाल्या आहेत. उद्धव आणि राज ठाकरे यांची काही दिवसांपूर्वी भेट झाल्यानंतर गेल्या 10 दिवसांत संजय राऊत आणि राज ठाकरे यांच्यात तीन बैठका झाल्या आहेत. तसेच राष्ट्रवादीचे प्रमुख शरद पवार यांच्याबरोबरही संजय राऊत यांची बैठक झाल्याचे समजत आहे. त्यामुळे उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे यांच्या युतीत शरद पवार सहभागी होणार का, अशी चर्चा सुरू आहे.


उबाठा-मनसे युतीसाठी खा. संजय राऊत यांच्या राज ठाकरे यांच्याबरोबर बैठकांचे सत्र चालू असतानाच दुसरीकडे राष्ट्रवादीच्या शरद पवार यांच्याबरोबरही एक बैठक झाली. संजय राऊत उबाठा-मनसे युतीत शरद पवारांच्या राष्ट्रवादीला सहभागी करून घेण्यासाठी प्रयत्नशील असल्याचे म्हटले जात आहे. यासंदर्भात खात्रीलायक माहिती नसली तरी तसे घडल्यास महाराष्ट्रात एक अनोखी राजकीय युती पाहायला मिळेल. इंडिया आघाडी केवळ लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीसाठीच होती, अशी भूमिका उबाठाने आधीच मांडली आहे. परप्रांतीयांच्या मुद्यावर काँग्रेस ही उबाठा-मनसेबरोबर जाऊ शकत नाही. मात्र, उबाठा-मनसे-राष्ट्रवादी युती होऊ शकते. त्याचीच चाचपणी संजय राऊत आणि शरद पवार यांच्या बैठकीतून केली जात आहे. मात्र, त्यामुळे काँग्रेस महाराष्ट्रातील राजकीय पटलावर एकटी पडेल, असे म्हटले जात आहे.


मराठीच्या मुद्यावरून उद्धव आणि राज हे ठाकरे बंधू एकत्र आल्यानंतर उबाठा-मनसे यांच्यात युती कधी होणार, याची सगळ्यांनाच उत्सुकता लागली आहे. परंतु दोन्ही ठाकरे बंधूंच्या अनेकदा भेटी होऊनही युती अजून जाहीर झालेली नाही. मात्र, दोन्ही बंधूंनी आपण एकत्र राहण्यासाठीच एकत्र आलो आहोत, असे वारंवार स्पष्ट करून युतीचे कायमच संकेत दिले आहेत. दोन्ही भावांतील सुसंवादही गेले काही दिवस वाढताना दिसत आहे. आता दिवाळीनंतर स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांची घोषणा होण्याची शक्यता आहे. या पार्श्वभूमीवर युतीसाठी पडद्यामागे हालचाली सुरू झाल्या आहेत. मागील 10 दिवसांत उबाठा खासदार संजय राऊत व मनसे प्रमुख राज ठाकरे यांच्यात 3 बैठका झाल्या आहेत. राज ठाकरे यांच्या शिवतीर्थ या निवासस्थानी या बैठका झाल्या आहेत. या बैठकांत  जागावाटपाचा फॉर्म्युला, प्रचाराती मुद्दे, किमान समान कार्यक्रम, दोन पक्षांच्या युतीत तिसरा पक्ष घ्यायचा काय अशा विविध मुद्यांवर चर्चा झाल्याचे म्हटले जात आहे.  


खा. संजय हे राज व उद्धव यांच्यात दुवा म्हणून काम करत आहेत, असेही चित्र आहे. मनसेसोबत युतीची चर्चा करण्यासाठी उद्धव ठाकरे यांनी खा. संजय राऊत यांच्याबरोबर आ. वरुण सरदेसाई, अनिल परब या नेत्यांवरही जबाबदारी टाकली आहे. पण जागावाटपाच्या चर्चेत काही पेच आल्यास उद्धव व राज ठाकरे तथा संजय राऊत चर्चा करतील, असे सांगितले जात आहे.

राज-फडणवीस एकत्र
वामन मांजरेकर लिखित आणि दिग्दर्शित ’पुन्हा शिवाजीराजे भोसले’ सिनेमाचा ट्रेलर उद्या लाँच होणार आहे. संध्याकाळी 5 वाजता लोअर परळ येथील फिनिक्स पलेडिअम येथे हा कार्यक्रम होणार आहे. या कार्यक्रमात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि राज ठाकरे उपस्थित राहणार आहेत.

उबाठा-मनसे-राष्ट्रवादीचा
ठाण्यात एकत्र मोर्चा
ठाणे महानगरपालिकेतील भ्रष्टाचाराविरोधात उबाठा, महाराष्ट्र नवनिर्माण सेना आणि शरद पवार गट हे तीन पक्ष मिळून 13 ऑक्टोबर रोजी मोर्चा काढणार आहेत. संध्याकाळी 4 वाजता गडकरी रंगायतन येथून ठाणे महापालिकेपर्यंत हा मोर्चा निघणार आहे. विशेष म्हणजे, या मोर्चात काँग्रेसचा समावेश नाही. या मोर्चाची माहिती देताना मनसेचे अविनाश जाधव म्हणाले की, उबाठा आणि मनसे रस्त्यावरची लढाई आता एकत्र लढणार आहे. भ्रष्टाचारामुळे ठाणे महानगरपालिका पूर्णपणे अस्ताव्यस्त झाली आहे. उबाठा, मनसे आणि शरद पवार गट जेव्हा सत्ता मिळवतील, तेव्हा या सर्व भ्रष्टाचाराची चौकशी केली जाईल.


हे देखील वाचा –

ट्रम्पचे स्वप्न भंगले! शांततेचा नोबेल मारिया कोरिना मचाडो यांना जाहीर

फडणवीस आणि राज उद्या एकाच मंचावर; ट्रेलर लॉंचिंगला एकत्र हजेरी.

जरांगेंमध्ये सुसंस्कृतपणा नाही; मंत्री छगन भुजबळांची टीका

Web Title:
For more updates: , , , stay tuned with Navakal
संबंधित बातम्या