Uddhav thackeray-मतदार याद्यांमधील घोळाबाबत विरोधकांनी आक्रमक भूमिका घेत मोर्चाची घोषणा केली असतानाच आता शिवसेना(उबाठा)ने या कथित मतचोरीबाबत आपल्या कार्यकर्त्यांचे प्रशिक्षण करण्याचा निर्णय घेतला आहे. आगामी २५ ऑक्टोबर रोजी पक्षातर्फे शाखा प्रमुख आणि उपशाखा प्रमुखांचा मेळावा घेण्यात येणार असून या मेळाव्यात उध्दव ठाकरे (Uddhav thackeray)हे स्वतः मार्गदर्शन करणार आहेत.
‘मतदार यादी कशी तपासावी, त्यातील घोळ कसा काढायचा आणि तो कोणाकडे द्यायचा’ याबाबत या मेळाव्यात स्वतः ठाकरे हे मार्गदर्शन करणार असल्याचे समजते. राज ठाकरे यांनी नुकताच आपल्या पदाधिकाऱ्यांचा मेळावा घेतल्यानंतर आता उद्धव ठाकरे यांनीही येत्या शुक्रवारी सुमारे तीन हजार उपशाखा प्रमुखांना एकत्र बोलावले आहे.
शाखाप्रमुख आणि उपशाखाप्रमुख हे थेट लोकांमध्ये काम करत असल्याने, त्यांना मतदार याद्या तपासण्याचे आणि त्यातील त्रुटी शोधून काढण्याचे प्रशिक्षण या मेळाव्यात दिले जाणार आहे. मतदार याद्यांमधील त्रुटी दूर होत नाहीत तोवर स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुका घेतल्या जाऊ नयेत, अशी मागणीही उबाठासह सर्व विरोधी पक्षांनी घेतली आहे. यापूर्वी महाविकास आघाडी आणि मनसेच्या नेत्यांनी निवडणूक आयोगाच्या अधिकाऱ्यांची भेट घेऊन याद्यांमधील त्रुटींबाबत तक्रार केली होती.
हे देखील वाचा–
ठाणे कोस्टल रोड प्रकल्पाला गती सर्व परवानग्या मंजूर !अडथळे दूर