मराठी कामगारांसाठी ठाकरे ब्रँड एकत्र! ‘या’ निवडणुकीसाठी शिवसेना आणि मनसेची युती

Uddhav Thackeray - Raj Thackeray Alliance

Uddhav Thackeray – Raj Thackeray Alliance: मराठीच्या मुद्यावर उद्धव ठाकरे व राज ठाकरे (Uddhav Thackeray – Raj Thackeray Alliance) एकत्र आल्याचे पाहायला मिळाले. दोन्ही नेते एकामंचावर आल्याचेही दिसून आले. तेव्हापासूनच आगामी मुंबई महापालिका निवणुकीसाठी दोन्ही ठाकरे बंधुंमध्ये युती होणार का? असा सवाल विचारला जात आहे. मात्र, आता महापालिका निवडणुकीआधीच मनसे आणि शिवसेनेत (ठाकरे गट) युती झाली आहे.

बेस्ट उपक्रमाच्या कामगार पतपेढीच्या निवडणुकीत या दोन्ही भावांच्या पक्षांनी एकत्र येण्याचा निर्णय घेतला आहे. हा निर्णय आगामी मुंबई महापालिकेच्या निवडणुकीची नांदी मानला जात आहे, त्यामुळे या युतीला विशेष महत्त्व प्राप्त झाले आहे.

बेस्ट पतपेढीची निवडणूक 18 ऑगस्ट रोजी होणार असून, त्यात ठाकरे गटाची ‘बेस्ट कामगार सेना’ आणि ‘महाराष्ट्र नवनिर्माण बेस्ट कर्मचारी सेना’ एकत्रितपणे निवडणूक लढवणार आहेत.

बेस्ट कर्मचाऱ्यांच्या प्रश्नांवर एकत्र

बेस्ट कामगार सेनेचे अध्यक्ष सुहास सामंत आणि मनसेचे मुंबई अध्यक्ष संदीप देशपांडे यांच्यात गेल्या काही दिवसांपासून या युतीबाबत चर्चा सुरू होती. वरिष्ठांच्या आदेशानुसार, दोन्ही नेत्यांनी एकत्र येण्याचा निर्णय घेतला आहे. यासंदर्भात सुहास सामंत यांनी एक पत्रकही जारी केले आहे.

दोन्ही पक्षांनी मिळून एक भूमिका मांडली आहे की, सध्याच्या सरकारमधील काही पुढारी आणि त्यांची धोरणे बेस्ट उपक्रमातील मराठी माणसाला हद्दपार करत आहेत. जून 2022 नंतर राज्यात आलेल्या सरकारमुळे सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांची ग्रॅज्युएटी थकीत आहे.

तसेच बेस्टचा स्वतःच्या मालकीचा बसताफा कमी होत आहे आणि नवीन नोकरभरती होत नाही. यामुळे कर्मचाऱ्यांमध्ये प्रचंड नाराजी असून, या प्रश्नांवर एकत्रितपणे लढण्यासाठी ठाकरे ब्रँड एकत्र आला आहे, असे या नेत्यांनी सांगितले.

युतीमुळे बळ वाढले

सध्या बेस्ट पतपेढीमध्ये उद्धव ठाकरे यांच्या बेस्ट कामगार सेनेची सत्ता आहे. गेल्या 9 वर्षांत केलेल्या कामगार कल्याणकारी कामांमुळे कामगारांकडून त्यांना चांगला प्रतिसाद मिळत आहे. आता महाराष्ट्र नवनिर्माण सेनेची साथ मिळाल्यामुळे ही ताकद आणखी वाढली असून, निवडणुकीत या युतीचा सकारात्मक परिणाम दिसून येईल, असा विश्वास सुहास सामंत यांनी व्यक्त केला आहे.

Share:

More Posts