Home / महाराष्ट्र / Uddhav Thackeray : सत्याच्या मोर्चात उद्धव ठाकरेंची अमित शाहांवर जहरीली टीका..

Uddhav Thackeray : सत्याच्या मोर्चात उद्धव ठाकरेंची अमित शाहांवर जहरीली टीका..

Uddhav Thackeray : आजचा मुंबईत पार पडला विरोधकांचा सत्याचा महामोर्चा. यावेळी अनेक दिग्गज नेत्यांनी उपस्थिती लावली. यावेळी उद्धव ठाकरेंनी देखील...

By: Team Navakal
Uddhav Thackeray

Uddhav Thackeray : आजचा मुंबईत पार पडला विरोधकांचा सत्याचा महामोर्चा. यावेळी अनेक दिग्गज नेत्यांनी उपस्थिती लावली. यावेळी उद्धव ठाकरेंनी देखील रोष व्यक्त केला. तसेच त्यांनी सत्ताधाऱ्यांवर देखील सडकून टीका केली आहे. ते म्हणतात या देशात लोकशाहीचा खून आपल्या डोळ्यांसमोर होतो आहे आणि खून करणारे त्या खुर्चीवर दिमाखात बसले आहेत. मत चोरी करणाऱ्यांना सांगतो की आज तुम्ही नुसती ठिणगी बघताय, पण ही ठिणगी कधी वणवा बनेल हे तुम्हाला कळणार नाही ते लक्षात ठेवा. या ठिणगीत तुमच्या बुडाला आग लावण्याची धमक आहे, असा इशारा यावेळी उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांनी दिला.

उद्धव ठाकरे यांनी अमित शाहांचा उल्लेख पुन्हा अनॅकाँडा असा करत जोरदार हल्लाबोल केला. पक्ष चोरल्यानंतर मतचोरीही करत असून यांची भूक काही क्षमत नाही, या अनाकोंडाला आता कोंडायलाच लागेल, नाहीतर हे लोक सुधारणार नाहीत, अशा जहरील्या शब्दात फटकारले. यावेळी ठाकरे म्हणाले,“आम्ही एकत्र आलो आहोत, मराठी माणसासाठी, हिंदूंसाठी आणि महाराष्ट्रासाठी. ही मूठ महाराष्ट्राच्या पसंतीची आहे. जर मतचोरी करून निवडणुका घेण्याचा प्रयत्न झाला, तर ही मूठ तुमच्या टाळक्यात हाणल्याशिवाय राहणार नाही

उद्धव ठाकरे यांनी आपल्या मतदार यादीतील नावाबाबत देखील धक्कादायक खुलासा केला. त्यांनी सांगितले, “माझ्या नावाने, माझ्या मोबाईल नंबरशिवाय, एक खोटा अर्ज देखील दाखल करण्यात आला. पडताळणीत स्पष्ट झालं की हा अर्ज मी केलेलाच नाही. तो अर्ज २३ऑक्टोबर २०२५ रोजी दाखल करण्यात आला होता. हे संपूर्ण प्रकरण हॅक करण्याचा प्रयत्न कोणीतरी केला आहे.

“संयुक्त महाराष्ट्रानंतर अगदी पहिल्यांदाच महाराष्ट्रात सर्व राजकीय पक्ष एकत्र आले आहेत. ही विरोधी पक्षांची नव्हे, तर लोकशाहीचं नेतृत्व करणाऱ्या पक्षांची एकजूट आहे,” असं उद्धव ठाकरे म्हणाले. त्यांनी पुढे स्पष्ट केलं की, “आम्ही निवडणुका होऊ द्यायच्या नाही असं म्हणलो नाही. आम्हाला देखील निवडणुका हव्यात, पण त्या प्रामाणिक हव्यात. चोरी, फेरफार आणि आधीच निकाल ठरवून घेतलेल्या निवडणुका आम्हाला नकोत. जर असं होणार असेल, तर मग जनता ठरवेल निवडणुका होऊ द्यायच्या की नाही ते.” अश्या तीव्र शब्दात त्यांनी मतदार याद्यांमधील घोळावरून निषेध व्यक्त केला आहे. त्यामुळे हि विरोधकांची एकजूट राज्याच्या राजकारणावर काय परिणाम दाखवते हे पाहणे महत्वाचे ठरेल.


हे देखील वाचा – Raj Thackeray : बोगस मतदार याद्यांवरून राज ठाकरेंचा संताप..

Web Title:
For more updates: , , , , stay tuned with Navakal
संबंधित बातम्या