Uddhav Thackeray on Gen Z Voting : निवणूक आयोगावर विरोधकांकडून सातत्याने होणारे आरोप आणि भाजपाचे प्रतिउत्तर ह्यामुळे राज्याच्या राजकारणाला नवीन वळण मिळाले आहे. सतत होणारे आरोप प्रत्यारोप यामुळे राज्यातील राजकारणात आग अजूनही धगधगती आहे. त्यात शनिवारी झालेल्या सत्याच्या मोर्चाने हि आग अधिक वाऱ्यासारखी पसरली त्यानंतर सत्ताधाऱ्यांकडून वेगवेगळ्या प्रतिक्रिया देखील ऐकायला मिळाल्या आहेत. त्यानंतर आज उद्धव ठाकरेंनी मुंबईत पत्रकार परिषद घेतली आहे. या वेळी त्यांनी दोन मुख्य अश्या महत्त्वाच्या घोषणा केल्या.
या वेळी ते म्हणतात “शेतकऱ्यांचे प्रश्न घेऊन आपण सरकारशी दोन हात करू” या शिवाय ते मराठवाड्यात जाऊन शेतकऱ्यांना भेटणार असल्याचं जाहीर केलं. यासह त्यांनी दुबार मतदारांचा मुद्दा देखील यावेळी उपस्थित केला.
या शिवाय उद्धव ठाकरे यांनी जनतेला आवाहन देखील केले आहे “सर्व मतदारांनी उद्धव बाळासाहेब ठाकरेंच्या जवळच्या शाखेत जाऊन मतदार याद्यांमध्ये तुमचं नाव आहे का? हे तपासा शिवाय कोणी तुमचं नाव वगळलेलं नाही ना? तुमचा पत्ता बदललेला नाही ना? तुमचं वय, लिंग अथवा धर्म बदललेला नाही ना याची खात्री करून घ्या.
उद्धव ठाकरे पुढे म्हणतात, निवडणूक आयोगाने १ जुलैपर्यंत नोंदणी असलेली नावे मतदार यादीत ठेवलेली आहेत. याचाच अर्थ १ जुलैनंतर ज्यांचे वय १८ वर्ष पूर्ण होईल त्यांना मात्र या निवडणुकीत मतदान करता येणार नाही. या मुलांना त्यांचा मतदानाचा अधिकार वापरता येणार नाही आहे. मात्र याच वयातील मुलांची क्रांती वाखाण्याजोगी आहे. मग हे सरकार Gen Z पिढीला घाबरतय का? असा सवाल देखील त्यांनी या निमित उपस्थित केला आहे.
पुढे ते असंही म्हणतात “लोकसभा व विधानसभा निवडणुकीच्या आधी ४५ लाख बोगस मतदार महाराष्ट्राच्या मतदार याद्यांमध्ये अगदी सराईतपणे घुसवले गेले. हे कोणी केलं? कसं केलं? हे अद्याप कोणालाच समजलेलं नाही. परंतु, याचा निवडणुकीच्या निकालावर मोठा परिणाम झाला.
या निवडणुकांच्या पार्शवभूमीवर, उद्धव ठाकरे यांनी आवाहन केलं की “सर्वांनी शिवसेनेच्या(UBT) शाखेत येऊन मतदार याद्या तपासा. तुमच्या घरातही तुमच्या परवानगीशिवाय ४०-५० माणसं अधिक घुसवली असतील, नोंदवली असतील तर त्याची अधिक तपासणी करा. असे आवाहन त्यांनी यावेळी केले.
हे देखील वाचा –
Chandrashekhar Bawankule : निवडणुकीमुळे हिवाळी अधिवेशन एक आठवडा लांबणार?









