Uddhav Thackeray : मुंबई महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर उबाठा पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी शाखा भेटींचा सक्रिय दौरा सुरू केला आहे. याच अंतर्गत त्यांनी लालबाग–परळ तसेच शिवडी परिसरातील अनेक शाखांना भेट देऊन शिवसैनिक आणि स्थानिक मतदारांशी थेट संवाद साधला. या भेटी दरम्यान पक्षाची धोरणे, आगामी निवडणूक तयारी आणि स्थानिक स्तरावरील कामकाज याबाबत चर्चाही करण्यात आली. उद्धव ठाकरे यांच्या या दौऱ्यामुळे स्थानिक कार्यकर्त्यांमध्ये उत्साह पसरला असून, मतदारांमध्ये पक्षाची उपस्थिती अधिक दृढ करण्याचा उद्देश असल्याचे सांगितले जात आहे.
यावेळी लालबाग–परळ परिसरात काही अज्ञातांकडून सार्वजनिक ठिकाणी आणि मेट्रो पिलर्सवर पोस्टरबाजी करण्यात आली. या पोस्टरवर लालबाग–परळ कायम धनुष्यबाणासोबत तसेच “आमचं ठरलयं, लालबाग–परळची एकच शान – धनुष्यबाण” असा मजकूर झळकतो. या पोस्टरमुळे परिसरात राजकीय चर्चांना उधाण आले असून स्थानिक नागरिक आणि पक्ष कार्यकर्त्यांमध्ये गडबड निर्माण झाली आहे.
राजकीय वर्तुळात आता चर्चेचा विषय हा आहे की, उद्धव ठाकरे यांच्या गटाकडून या पोस्टरबाजीला नेमके काय स्वरूपात प्रत्युत्तर दिले जाईल. पक्षाने या प्रकारावर अधिकृत प्रतिक्रिया देणे किंवा आगामी कार्यक्रमांद्वारे मतदारांपर्यंत आपले संदेश पोहचवणे याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. यासोबतच विरोधक पक्षाचेही या संदर्भात धोरणात्मक पावले किती प्रभावी ठरतात, याचीही सर्व स्तरावर पाहणी सुरु आहे.
या प्रकारामुळे मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुकीच्या प्रचाराचा रंग काहीसा तापलेल्या वातावरणात दिसत असून, पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आणि त्यांच्या गटाकडून पुढील पावले कोणती असतील, याकडे स्थानिक राजकारण आणि मतदार यांचं लक्ष केंद्रीत झालं आहे.
हे देखील वाचा – Ravindra Chavan : विलासराव देशमुखांच्या नावावरून राजकीय वादळ; चव्हाणांच्या विधानाने लातूर-जालन्यात उग्र आंदोलन









