Uddhav Thackeray : अतिवृष्टीने झोडपलेल्या मराठवाड्यातील शेतकऱ्यांच्या व्यथा जाणून घेण्यासाठी उद्धव ठाकरे ४ दिवसांच्या मराठवाडा दौऱ्यावर आहेत. धाराशिवमधील करजखेडा, लातूरमधील भुसणी गावातील त्यांनी शेतकऱ्यांशी संवाद साधत त्यांनी राज्य सरकारवर जोरदार टीका केली. मी मत मागायला नाही तर हिंमत द्यायला आलो आहे अशी भावनिक साद देखील त्यांनी शेतकऱ्यांना दिली आहे. उद्धव ठाकरेंनी अतिवृष्टी, कर्जबाजारीपणा आणि अपुरे पॅकेज यावरून सरकारला लक्ष्य केले. त्यांनी शासनाकडे शेतकऱ्यांसाठी तातडीने ठोस उपाययोजना करण्याची मागणी देखील केली.
उध्दव ठाकरे म्हणतात की, आज मी जाहीर सभा घ्यायला आलेलो नाही. कारण जाहीर सभेचा खूप तामझाम असतो. मी आज मत मागण्यासाठी नाही तर तुम्हाला हिम्मत देण्यासाठी आलो आहे. धाराशिव औसा ने आपल्याला माजी खासदार दिला आहे. मात्र कोणी आपल्याला काही दिले असो अथवा नसो पण हे माझे कर्तव्य आहे की माझ्या हातात जे अधिकार असतील त्याचा उपयोग शेतकऱ्याच्या हितासाठी करायचा.
आज परिस्थिती अशी आहे की, संकटानंतर सगळे शोबाजी करायला येतात. त्यांचे फोटो लावून मदतकार्य होतात. हजारो कोटींच्या भ्रष्टाचाराच्या कथा आहेत. मुंबई महापालिका लुटून खाऊन टाकली. अदानीच्या सिमेंटच्या पोत्याला हमीभावापेक्षा कमी भाव मिळतो का ? आपत्तीग्रस्त शेतकऱ्याचे घर वाहून गेले.सोयाबीनला हमीभावापेक्षा कमी भाव मिळाला. म्हणू त्याच्या घराच्या बांधकामासाठी लागणाऱ्या सिमेंटचा भाव कमी होतो का ? ते सर्व मात्र कमाई करून ऐशआरामात जीवन जगत आहेत असा हल्लाबोल देखील उद्धव यांनी केला आहे.
हे देखील वाचा –
Death Threat :पत्रकार राणा अय्यूबांना जीवेमारण्याची धमकी ! गुन्हा दाखल









