Uddhav Thackeray : उद्धव ठाकरे कायमच कोणत्या ना कोणत्या कारणावरून चर्चेत असतात पण आता ते चर्चेत आहेत ते त्याच्या मराठवाडा दौऱ्यावरून. दिवाळी अगोदर शेतकऱ्यांच्या बांधावर गेलेले उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आता दिवाळीनंतरही पुन्हा मराठवाडा दौऱ्यावर जाणार आहेत.
५ ते ८ नोव्हेंबर या कालावधीत त्यांचा हा दौरा असणार असल्याची माहिती आहे. आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर हा दौरा असायचे बोलले जात आहे. त्यामुळे आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर ठाकरेंच्या या दौऱ्याला वेगळे महत्त्व प्राप्त झाले आहे.
या दौऱ्याला जशी आगामी स्थानिक स्वराज्य संस्थेची पार्श्वभूमी आहे तशीच या दौऱयाची अजून एक बाजू आहे ती म्हणजे राज्य सरकारची मदत शेतकऱ्यांना पोहचली की नाही, दिलेली मदत पुरेशी आहे का, याचा आढावा देखील उद्धव ठाकरे या दौऱ्यात घेणार आहेत. ठाकरेंनी गेल्या दौऱ्यामध्ये शेतकऱ्यांना कर्जमुक्त करा, हेक्टरी ५० हजार रुपये मदत द्या, अशी मागणी करण्यात आली होती. तसेच छत्रपती संभाजीनगर, जालना, बीड, धाराशिव आणि नांदेड जिल्ह्यातील शेतकऱ्यांशी ते संवाद साधणार आहेत.
ऑगस्ट आणि सप्टेंबर महिन्यात अतिवृष्टीने राज्यातील शेतकऱ्यांचे प्रचंड नुकसान झाले आहे. ३६ पैकी ३१ जिल्ह्यांतील ३७ लाख ९१ हजार हेक्टर शेतजमिनीवरील पिकांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले. यामध्ये १७ जिल्ह्यांत सर्वाधिक नुकसान झाल्याचे आढळून आले. यासाठी राज्य सरकारने वेगवेगळे शासनादेश काढून मदतीची घोषणा केली होती. जुलै-ऑगस्टमध्ये झालेल्या नुकसानभरपाईपोटी २२१५ कोटींची मदत जाहीर केली आहे. तर २० ऑक्टोबरला नवा शासनादेश काढून बाधित शेतकऱ्यांना ३३ कोटी ६३ लाख रुपयांची मदत मंजूर करण्यात आली. परंतु या मदती शेतकऱ्यांपर्यंत खरच पोहचता आहेत का हे पाहन देखील तितकच महत्वाचं ठरणार आहे.
हे देखील वाचा – Womens World Cup 2025: भारताची सेमीफायनल बलाढ्य ऑस्ट्रेलियाशी! जाणून घ्या सामना कधी आणि कुठे होणार?









