Uddhav Thackeray Vs Eknath shinde गेल्या दोन वर्षांपासून सुरु असलेल्या शिवसेना चिन्ह धनुष्यबाणाचा संघर्ष उद्या संपणार? मागच्या २ वर्षांपासून या वादामुळे राजकीय वातावरंन मात्र कमालीच ढवळून निघाल. आता अशातच राजकीय संघर्षावर उद्या सर्वोच्च न्यायालयात या खटल्यावर अंतिम सुनावणी पार पडणार आहे. या निकालाकडे महाराष्ट्रासह संपूर्ण देशाचे लक्ष लागले आहे. राष्ट्रपती आणि राज्यपाल वादामुळे १९ ऑगस्ट ते १० सप्टेंबर या काळात ही सुनावणी लांबणीवर पडली होती. मात्र आता या सुनावणीला अखेर मुहूर्त मिळाला. शिवसेना चिन्हावरून सुरू असलेला हा खटला न्यायमूर्ती सूर्यकांत यांच्या खंडपीठासमोर अंतिम टप्प्यात आहे.
याआधी १४ जुलैला याप्रकरणी सुनावणी झाली होती. त्यानंतर आता उद्या हि सुनावणी होणार आहे. धनुष्यबाण हे चिन्ह कोणाला मिळणार याकडे साऱ्या महाराष्ट्राच लक्ष लागलेलं आहे. स्थानिक निवडणुकांच्या दृष्टीने हा निकाल महत्त्वाचा ठरणार आहे. यासंदर्भात मागच्या २ वर्षात अनेक राजकीय नेत्यांनी दखल आपल्या परखड भूमिका मांडल्या.
याच पार्शवभूमीवर वकील असीम सरोदे यांनी एक्सवर पोस्ट केली आहे. त्यात ते म्हणतात; शिवसेना धनुष्यबाण चिन्हाबाबत उद्या अंतिम सुनावणी घेणार असे सर्वोच्च न्यायालयाने जाहीर केले आहे. त्यानुसार न्या.सूर्यकांत हे सुनावणी घेतील अशी अपेक्षा आहे. पुढे ते असेही म्हणतात; धनुष्यबाण पक्षचिन्ह मूळ शिवसेनेचे आहे. ते चोरले आहे. ही चोरी महाराष्ट्राने पाहिली आहे. अंतिम सुनावणी घेतली तरी दोन्ही बाजूची तयारी आहे. पक्ष चिन्हाचे वाटप करताना कायद्याचे उल्लंघन झाले का?, शिवसेना कुणाची हे ठरवण्याचा अधिकार सर्वोच्च न्यायालयाला आहे. परंतु; ते निवडणूक आयोगाला अधिकार आहेत का? हे २ प्रश्न महत्त्वाचे ठरणार आहेत. त्यामुळे अंतिम सुनावणी उद्या होऊ शकते. उद्याच निकाल येईल असे होणार नाही. कदाचित काय दिवस राखीव ठेवले जातील. जर दुपारी १२ वाजता हि सुनावणी झाली तर १-२ तास हि सुनावणी चालेल. त्यामुळे धनुष्यबाण हे चिन्ह नेमक कोणाला मिळणार हे पाहणं महत्वाचं ठरेल.
हे देखील वाचा –
Selling a minor girl अल्पवयीन मुलीची विक्री करून जबरदस्तीने लग्न.. नवऱ्यासह 6 जणांवर गुन्हा दाखल