Home / महाराष्ट्र / Ujjwala Thite : अनगर नगरपंचायतीत निवडणुकीच्या अर्जावरून राजकारण तापले..

Ujjwala Thite : अनगर नगरपंचायतीत निवडणुकीच्या अर्जावरून राजकारण तापले..

Ujjwala Thite : राज्यात निवडणुकीच्या पार्शवभूमीवर स्थानिक पातळीवरील राजकारण जोरात वाजताना दिसत आहे. अनेक कुरघोडी देखील पाहायला मिळत आहेत. सोलापुरातील...

By: Team Navakal
Ujjwala Thite
Social + WhatsApp CTA

Ujjwala Thite : राज्यात निवडणुकीच्या पार्शवभूमीवर स्थानिक पातळीवरील राजकारण जोरात वाजताना दिसत आहे. अनेक कुरघोडी देखील पाहायला मिळत आहेत. सोलापुरातील अनगर गाव देखील याला अपवाद ठरू शकलेल नाही. अनगरमधील वाद हा कोणापासूनच लपलेला नाही. याच संधर्भात उज्ज्वला थिटे यांनी राजन पाटील आणि कुटुंबावर अप्रत्यक्षपणे निशाणा साधला आहे. त्या म्हणतात मी उमेदवारी अर्ज दाखल केला तिथेच माझा विजय झाला आहे. कारण यांच्याविरोधात उभे राहण्याची कुणी हिंमत केली न्हवती. मी उमेदवारी अर्ज भरण्यासाठी किती संघर्ष केला हे महाराष्ट्रातील जनतेने पाहिले आहे. माझा उमेदवारी अर्ज बाद करण्यात येईल ही भीती मला या आधी होतीच आणि तसेच झाले असे म्हणत उज्ज्वला थिटे यांनी राजन पाटील यांच्यावर अप्रत्क्षपणे टीका केली आहे.

राष्ट्रवादी काँग्रेसच्या उज्ज्वला थिटे यांचा अनगर नगर पंचायतीच्या नगराध्यक्षपदाचा भरलेला अर्ज बाद झाला. यानंतर थिटे यांनी संताप व्यक्त केला आहे. त्या म्हणतात की, अनगरमध्ये एका महिलेचा लोकशाही पद्धतीने निवडणूक लढण्याचा अधिकार हिसकावला जात आहे. मी संघर्ष करत तिथे पोहोचले होते.यावेळी माझा कसा पाठलाग करत मारहाण करण्याचा प्रयत्न करण्यात आला हे संपूर्ण महाराष्ट्राने पाहिले आहे. एवढे करुणही मी तिथेपर्यंत पोहोचले आणि उमेदवारी अर्ज देखील भरला मात्र जी भीती होती ती खरी ठरली.

यासंदर्भात उज्ज्वला यांनी राजन पाटलांवर जोरदार टीका केली आहे. त्या म्हणतात मला जी दोन मते पडणार होती ती स्वाभिमानाने पडणार होती. तुमच्यासारखे पैशाने विकत घेत निर्णय बदलवणारे आम्ही नाही. आम्ही तुमच्या कुठल्याही दबावाला आम्ही बळी पडणार नाही.माझ्याकडे अनेक लोकांना पाठवले तुम्हाला हे पद देऊ, घरदार नीट करू, मुलाला नोकरी लाऊन देऊ असे प्रलोभने मला देण्यात आली. पण तरीही मी त्यांच्यासोबत झुकले नाही. मला अनुमोदक आणि सूचक मिळू दिले जात नव्हते. पण माझ्या मुलाने सूचक म्हणून सही केली होती. आम्ही सर्व कागदपत्रे चेक केले होते. आम्ही सर्व मांडणी केली होती.

उज्ज्वला थिटेंनी प्रभाग क्रमांक ४ ऐवजी ५ असा चुकीचा लिहिला. उज्ज्वला थिटेंनी मतदार यादीत अनुक्रमांक २१७ ऐवजी १०४२ असा चुकीचा नमूद केला. उज्ज्वला थिटेंनी वय नमूद केले पण त्याबाबतीतील पुरावे दिलेच नाहीत. उज्ज्वला थिटेंच्या अर्जावर सूचक म्हणून सहीच नव्हती केली, या कारणाने त्यांचा अर्ज बाद करण्यात आला आहे.


हे देखील वाचा – Budget Friendly Phones 2025 : तुमच्या बजेटमध्ये घ्या बेस्ट स्मार्ट फोने..

Web Title:
For more updates: , , stay tuned with Navakal
संबंधित बातम्या