Unemployment News- कर्मचारी कपात हे संकट सध्या जगभरात मोठ्या प्रमाणार पसरलं आहे. टीसीएस आणि अॅक्सेंचर या दोन मोठ्या आयटी कंपन्यांनी दीर्घकाळ काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांना हाकलून देण्याचा निर्णय घेतला आहे. कर्मचारी कपातीचे हे संकट लवकर क्षमनार दिसत नाही. टीसीएस आणि अॅक्सेंचरसारख्या आणखी एका कंपनीने वर्षअखेरपर्यंत मोठ्या प्रमाणात कर्मचाऱ्यानां नारळ देऊ शकते.
जागतिक पातळीवर तणावाची परिस्थिती सुरु आहे. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प सतत टॅरिफचा धडाका लावत आहेत तर; दुसरीकडे इस्रायल-हमास यांच्यातील संघर्ष थांबत नाही आहे. अशा परिस्थितीत, कंपन्यांकडूनही क्रॉस कटिंगचं सावट पाहायला मिळत आहे. या आधी टीसीएस आणि अॅक्सेंचर या मोठ्या आयटी कंपन्यांनी कर्मचारी कपात करण्याची घोषणा केली तर; आता यातच आणखी एका कंपनीची भर पडली आहे.
फ्रेंचकार या निर्माता कंपनीने जागतिक स्तरावर ३,००० मुख्यतः सहाय्यक भूमिकांमध्ये असलेल्या कर्मचाऱ्यांची हकालपट्टी करण्याचा निर्णय घेतला आहे. ही लेआऑ योजना एका स्वैच्छिक रिडंडंसी कार्यक्रमांतर्गत आहे, आर्थिक पॅकेजच्या बदल्यात कर्मचारी कंपनी सोडू शकतात. याबाबत अंतिम निर्णय वर्षाच्या अखेरीस अपेक्षित आहे.
वाढत्या स्पर्धात्मक वातावरण याचबरोबर आर्थिक दबावामुळे कंपनीने हा निर्णय घेतला आहे. या निर्णयाचा परिणाम बोलोन-बिलानकोर्ट येथील मुख्यालयातील कर्मचाऱ्यांवर आणि जगभरातील इतर कार्यालयांवर याचा मुख्य परिणाम होऊ शकतो. हा निर्णय रेनॉल्टच्या कॉस्ट कटिंग ‘Arrow’ उपक्रमाचा एक भाग आहे
ज्याअंतर्गत मानव संसाधन, वित्त आणि इतर काही विभागांमध्ये 15% कपात करण्याचे लक्ष्य आहे. रेनॉल्टने पुढे असेही सांगितले आहे की कंपनीचा खर्च कमी करण्याचा विचार सुरु आहे, परंतु; या बाबत कोणत्याही प्रकारचा ठोस निर्णय घेतलेला नाही त्यामुळे याबाबत अधिकृत आकडेवारी जाहीर करू शकलो नाही.
रेनॉल्टला युरोपियन स्पर्धक तसेच चिनी इलेक्ट्रिक वाहन उत्पादकांकडून मोठ्या प्रमाणावर स्पर्धेचा सामना करावा लागत आहे. फ्रेंच वृत्तसंस्था आय-इन्फॉर्मच्या अहवालात म्हटले आहे की जागतिक ऑटोमोबाईल उद्योग सध्याआव्हानांना तोंड देत आहे.
हे देखील वाचा –