Union Agriculture Minister : अतिवृष्टीनंतर महाराष्ट्र शासनाने शेतकऱ्यांना आर्थिक मदत देण्यासाठी कोणत्याही प्रकारचा प्रस्ताव केंद्राकडे पाठविलेला नसल्याची माहिती, कृषिमंत्री शिवराजसिंह चौहान यांनी मंगळवारी लोकसभेत दिली. केंद्रीय कृषिमंत्र्यांचं हे विधान राज्य सरकारने केलेल्या दाव्यांच्या अगदी विरोधी असल्याचं दिसून येत आहे. अतिवृष्टीमुळे १४ लाख हेक्टर शेती नष्ट झाल्याची माहिती राज्याचे कृषिमंत्री दत्तात्रय भरणे यांनी याआधी दिली होती; परंतु महाराष्ट्र सरकारने केंद्राला एक लाख १० हजार ३०९ हेक्टर शेती नष्ट झाल्याचे स्पष्ट केले.
केंद्रीय कृषिमंत्री शिवराजसिंह चौहान यांनी मंगळवारी लोकसभेत केलेल्या या खुलास्यामुळे मोठे वादळ येणायची शक्यता आहे. महाराष्ट्र शासनाने राज्य आपत्ती निवारण निधीतून अतिवृष्टी आणि पुरामुळे उद्ध्वस्त झालेल्या शेतकऱ्यांना ४१७६.८० कोटींची मदत केली होती. यात केंद्राचा वाटा ३१३२.८० कोटी रुपयांचा असून हा निधी १५६६.४० कोटींच्या दोन टप्प्यांत राज्याला देण्यात आला असल्याची माहिती आहे.
राज्याचे कृषिमंत्री दत्तात्रय भरणे यांनी यावर प्रतिक्रिया देत म्हटले अतिवृष्टीमुळे २९ जिल्ह्यांच्या १९१ तालुक्यातील १४ लाख ३६ हजार हेक्टर शेती नष्ट झाल्याची माहिती दिली; परंतु केंद्राला दिलेल्या माहितीत केवळ एक लाख १० हजार ३०९ हेक्टरमधील शेती नष्ट झाल्याचेच सांगण्यात आले आहे.ते पुढे म्हणाले की, केंद्राला कोणताही प्रस्ताव पाठवताना अचूक पाठवला गेला पाहिजे. पुढे त्यांना पत्रकारांनी केंद्रीय कृषिमंत्री खोटे बोलले का? असा सवाल केल्यानंतर त्यांनी तात्काळ यावर उत्तर दिले आहे ते म्हणतात केंद्रीय कृषिमंत्री शिवराज सिंह खोटे बोलले नसावे. कदाचित प्रस्ताव त्यांच्यापर्यंत पोहचला नसावा. केंद्राच्या रकमेसाठी राज्याचे शेतकऱ्यांची मदत थांबवलेली नाही. केंद्राची मदत मिळेल हे गृहीत धरून साधारण २० हजार कोटींचे २८ जीआर राज्याने काढले आहे. १९ हजार ८०१ कोटी मदत शेतकऱ्याला केली आहे. केंद्राला साधारणपणे १ कोटी ३ लाख हेक्टर एवढ्या शेतीसाठीचा अहवाल कृषीविभागाकडून पाठवला आहे. असे ते म्हणाले.
अतिवृष्टीमुळे कुठे कुठे नुकसान झाले?
जून-ऑक्टोबर या कालावधीत कोकण, मध्य महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भात मुसळधार पावसाने शेती, पायाभूत सुविधा आणि दैनंदिन जीवनावर मोठा परिणाम केला. प्रभावित क्षेत्रातील सोयाबीन, मका, द्राक्ष, कांदा, ऊस यांसारख्या पिकांचे मोठ्याप्रमाणावर नुकसान झाले. नाशिक, रत्नागिरी आणि सांगलीमध्ये अनेक नद्यांना यावेळी पहिल्यांदाच पूर आला.
हे देखील वाचा – Devendra Fadnavis And Sanjay Raut : देवेंद्र फडणवीस आणि संजय राऊतांची भेट ठरली चर्चेचा विषय









