Home / महाराष्ट्र / Unity among the opposition : राज्यात विरोधीपक्षांमध्ये एकतेचे वारे ; मतदारयाद्यांच्या मुद्यावरून विरोधकांमध्ये एकजूट..

Unity among the opposition : राज्यात विरोधीपक्षांमध्ये एकतेचे वारे ; मतदारयाद्यांच्या मुद्यावरून विरोधकांमध्ये एकजूट..

Unity among the opposition : सध्या राज्यात महापालिका, जिल्हा परिषद निवडणुकांच्या पार्शवभूमीवर राजकीय वर्तुळातील वातावरण मात्र चांगलंच तापलेले दिसून येत...

By: Team Navakal
Unity among the opposition

Unity among the opposition : सध्या राज्यात महापालिका, जिल्हा परिषद निवडणुकांच्या पार्शवभूमीवर राजकीय वर्तुळातील वातावरण मात्र चांगलंच तापलेले दिसून येत आहे. महाराष्ट्रात मतचोरीच्या आरोपांमुळे राजकीय वातावरण ढवळून निघालं आहे. मविआने निवडणूक आयोगावर (Election Commission) तीव्र शब्दात टीका करत थेट लोकशाहीवरच (Democracy)प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे. तर महायुतीतील भाजपसह घटक पक्षाने निवडणूक आयोगावर (Election Commission)केलेले आरोप फेटाळून लावले आहेत. शिवाय मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी या संदर्भांत निवडणूक आयोगाला इशारा सुद्धा दिलाय. जोपर्यंत मतदार यादीतील घोळ दूर होत नाही आणि यादी पूर्णपणे योग्य होत नाही, तोपर्यंत निवडणुका घेऊनच दाखवा, असे ते म्हणाले.

महाविकास आघाडीतील घटकपक्षांनी निवडणूक आयोगाविरोधात काँग्रेस आणि मनसे यांच्यासह १ नोव्हेंबरला मोर्चा काढण्याची मोठी घोषणा केली आहे. दोन ठाकरे आणि एक पवार यांचा सहभाग असणारा हा एकत्रित मोर्चा निवडणूक आयोगाबरोबरच सत्ताधारी पक्षाला देखील चांगलाच घाम फोडणारा ठरेल का हे पाहन महत्वाचं ठरणार आहे. विधानसभा निवडणुकीत महाराष्ट्रात मतचोरी झाल्याचा गंभीर दावा काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी केला होता या सगळ्या वादावरून महाराष्ट्रातील राजकारण सध्या चांगलेच पेटले आहे.

राहुल गांधी यांनी या संदर्भात निवडणूक आयोगासह महायुतीच्या नेत्यांवर देखील ताशेरे ओढले आहेत. त्यातच स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीचे वारे वाहू लागले आहेत. सध्या या निवडणूकीच्या पार्श्वभूमीवर राज्यातील वातावरण मात्र ढवळून निघालेलं आहे. विरोधकांनि मात्र कोणत्याही मुद्यांपेक्षा मतचोरीचा मुद्दा प्रमुख बनवला आहे. महाराष्ट्रातील ३ बडे नेते या मुद्यावर एकत्र आल्याचे दिसून येत आहे. यात शरद पवार, उध्दव ठाकरे, राज ठाकरे यांच्यासह काँग्रेस आणि इतर समविचारी पक्षांची जवळीक झाल्याचे दिसून येत आहे.

ठाकरेबंधूंची जवळीक गेल्या काही महिनापासून महाराष्ट्र पाहतो आहे. सुरूवातीला केवळ मराठी भाषेच्या मुद्यासाठी एकत्र आलेले ठाकरे बंधूंनी आता महाराष्ट्राच्या मतदार याद्यात ९६ लाख बोगस मतदार असल्याचा मुद्दा त्यांनी उपस्थित केला आहे. महाराष्ट्रात होणारी प्रगती ही मराठी माणसाच्या थडग्यावर होत असेल तर ती खपवून घेणार नाही, असा इशारा देखील मनसेने दिला आहे. त्यामुळे विरोधकांच्या या एकजुटीला खरंच यश येईल का? हे येणाऱ्या काळात स्पष्ट होईलच.


हे देखील वाचा –लाज वाटायला हवी’; गंभीर-आगरकर यांच्यावरील ‘त्या’ फेक पोस्टवर नवज्योतसिंग सिद्धूंची संतप्त प्रतिक्रिया

Web Title:
For more updates: , , , , stay tuned with Navakal
संबंधित बातम्या