Home / महाराष्ट्र / Uran Election Result : नगरपरिषदेची मतमोजणी सुरु होताच जोरदार राडा; उरणमध्ये मतमोजणी केंद्रबाहेर झाला राडा

Uran Election Result : नगरपरिषदेची मतमोजणी सुरु होताच जोरदार राडा; उरणमध्ये मतमोजणी केंद्रबाहेर झाला राडा

Uran Election Result : राज्यभरात नगरपंचायती आणि नगरपालिकांची मतमोजणी सुरू आहे. त्यामुळे उमेदवारांमध्ये धाकधूक वाढली आहे, तर कार्यकर्त्यांची उत्सुकता मात्र...

By: Team Navakal
Uran Election Result
Social + WhatsApp CTA

Uran Election Result : राज्यभरात नगरपंचायती आणि नगरपालिकांची मतमोजणी सुरू आहे. त्यामुळे उमेदवारांमध्ये धाकधूक वाढली आहे, तर कार्यकर्त्यांची उत्सुकता मात्र शिगेला पोहोचली आहे. अशातच रायगडच्या उरणमध्ये मतमोजणी (Uran Nagarparishad Election) केंद्रबाहेर राडा झाल्याची धक्कादायक बातमी समोर येत आहे. नाष्ट्याचा कॉन्ट्रॅक्टर म्हणत एक इसम स्ट्राँग रुमच्या दिशेने गेल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. यावर महाविकास आघाडीच्या नेत्यांनी आक्षेप घेत प्रचंड आरोप केले आहे. मतमोजणीला अवघे काही मिनिटे उरले असताना हा प्रकार घडल्याने मतमोजणी केंद्रावर काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाले होते.

Uran Nagarparishad Election : नगराध्यक्ष पदाचा उमेदवार भावना घाणेकर यांचा तहसीलदारांना थेट सवाल

मतमोजणी सुरू होण्याआधी कुणालाच प्रवेश नसताना हा इसम स्ट्राँग रुमकडे गेलाच कसा? असा थेट सवाल महाविकास आघाडीच्या नगराध्यक्ष पदाचा उमेदवार भावना घाणेकर यांनी तहसीलदारांना हा सवाल केला आहे.

सध्या मतमोजणी केंद्रावर पोलिसांनी परिस्थिती नियंत्रणात आणत या प्रकरणात हस्तेक्षेप केला आहे. मात्र या सर्व प्रकारानंतर मतमोजणी केंद्रावर काहीसा गोंधळ देखील पाहायला मिळाला.

Kolhapur Nagarparishad Election Result: निकालाआधीच लावले विजयाचे बॅनर

कोल्हापूर जिल्ह्यातील कागल नगरपरिषदेच्या हद्दीत मंत्री हसन मुश्रीफ आणि समरजीत सिंह घाटगे यांच्या पॅनलच्या सर्व उमेदवार आणि लोकनियुक्त नगराध्यक्ष पदासाठी उभ्या असलेल्या सविता प्रताप माने यांच्या विजयाचे बॅनर लावण्यात आले आहेत त्यामुळे सध्या हे बॅनर चर्चेचा विषय ठरत आहेत.

राज्यभरातल्या नगरपंचायती आणि नगरपालिकांची मतमोजणीचा निकाल आता काही तासांवरच येऊन ठेपला आहे. त्यामुळे उमेदवारांची धाकधूक वाढली आहे. तर कार्यकर्त्यांची उत्सुकता देखील शिगेला पोहोचली आहे. अशातच कोल्हापूर जिल्ह्यामध्ये तीन नगरपंचायत आणि दहा नगरपालिकांसाठी दोन डिसेंबर रोजी मतदान पार पडले. राज्यात सर्वाधिक मतदान हे कोल्हापूर जिल्ह्यामध्ये पार पडले आहे. त्यामध्ये मुरगुड नगरपालिकेसाठी राज्यात सर्वाधिक 88% मतदान करण्यात आले आहे. त्यामुळे कोल्हापूर जिल्ह्यात कोण आघाडी बाजी मारणार याकडे कोल्हापूरकरांच्या नजरा लागल्या आहेत.


हे देखील वाचा – Best Movies of 2025: बॉक्स ऑफिसवर दाक्षिणात्य वादळ! 2025 मध्ये ‘या’ चित्रपटांनी मोडले कमाईचे सर्व विक्रम

Web Title:
For more updates: , , stay tuned with Navakal
संबंधित बातम्या