कोल्हापूर– वर्षाच्या (२०२४-२५) सुरुवातीच्या सहामाहीत उत्तर प्रदेशने (Uttar Pradesh) तेल कंपन्यांना सर्वाधिक इथेनॉल (ethanol)पुरवठा करून देशात अव्वल स्थान पटकावले आहे. जूनअखेर उत्तर प्रदेशने ९३ कोटी लिटर इथेनॉलचा पुरवठा केला आहे. या यादीत महाराष्ट्राचा (Maharashtra ranks second)क्रमांक दुसऱ्या स्थानी आहे. महाराष्ट्राने ६९ कोटी लिटर इथेनॉलचा पुरवठा केला आहे.
विशेष म्हणजे, इथेनॉल निर्मिती क्षमतेत महाराष्ट्र आघाडीवर असूनही, प्रत्यक्षात पुरवठ्याच्या बाबतीत मात्र तो उत्तर प्रदेशच्या मागे पडला आहे.तमिळनाडू (Tamil Nadu ranks third) ६० कोटी लिटरचा पुरवठा करत तिसऱ्या स्थानावर आहे.कर्नाटकने (Karnataka)४७ कोटी लिटरचा पुरवठा केला आहे.यंदा कमी क्षमतेने ऊस हंगाम चालल्याने याचा फटका महाराष्ट्रातील उसावर आधारित इथेनॉल प्रकल्पांना बसला आहे.
सध्या देशाची वार्षिक इथेनॉल निर्मिती (ethanol production)क्षमता १८२२ कोटी लिटर (8.22 billion litres) इतकी आहे.या क्षमतेच्या बाबतीत महाराष्ट्र देशात अव्वल आहे. महाराष्ट्राची इथेनॉल उत्पादन क्षमता ३९६ कोटी (3.96 billion)लिटर आहे. त्याखालोखाल उत्तर प्रदेश ३३१ कोटी लिटर क्षमतेसह दुसऱ्या क्रमांकावर,तर कर्नाटक २७० कोटी लिटर क्षमतेसह तिसऱ्या क्रमांकावर आहे.उत्तर प्रदेशमध्ये असलेली उत्पादन क्षमता आणि प्रत्यक्षात झालेला पुरवठा यात कमी तफावत आहे. याउलट, महाराष्ट्राची क्षमता सर्वाधिक असूनही, प्रत्यक्षात मात्र क्षमतेच्या तुलनेत इथेनॉल निर्मिती कमी झाली आहे. त्यामुळे इथेनॉल पुरवठा घटला आहे.