Vasai Virar Diwali Fort : दिवाळी म्हटलं कि सुट्टी आली फटाक्यांची आतिषबाजी देखील आली आणि गड किल्ले बनवणं सुद्धा आलं. दिवाळीत पर्यटनाला सुद्धा तितकच महत्व आहे. वसई विरार मध्येही सध्या इतिहासाची साक्ष देत असलेल्या गड किल्ल्यांचे दर्शन वसईकरांना वारंवार होत आहे. वसई विरार मध्ये ठिकठिकाणी गड ,किल्यांचे देखावे उभारण्यात आले आहेत. यात प्रतापगड, कोंडाणा, भुदरगड, पन्हाळा, राहगड खांदेरी अश्या किल्यांच्या समावेश असून हे किल्ले बघण्यासाठी बरीच गर्दी देखील होत असते.
वसई विरारकरानी पुढच्या पिढीला आपल्या राज्याचा इतिहास सांगण्यासाठी केले हे सुंदर देखावे खरच डोळ्याचे पारणे फेडणारे आहेत. छत्रपती शिवाजी महाराज यांचा इतिहास लोकांपुढे यावा यासाठी वसई , नालासोपारा आणि विरार मध्ये ठिकठिकाणी गड किल्ले उभारण्यात आले आहेत.
ज्या किल्यांची प्रतिकृती उभारण्यात आली आहे त्या किल्ल्याची माहिती हि सुव्यवस्थितपणे देण्यात आली आहे. अनेक शिवप्रेमींनी या किल्याला भेट देत इथला अनुभव सांगितलं आहे.
हे देखील वाचा – Ranveer Deepika Baby: दीपिका-रणवीरची लेक ‘दुआ’ कोणासारखी दिसते? लक्ष्मीपूजनाच्या दिवशी शेअर केला मुलीचा फोटो