Home / महाराष्ट्र / Asha Bhosle: आशा भोसले यांचे निधन; भारतीय संगीतविश्वातील एका युगाचा अंत

Asha Bhosle: आशा भोसले यांचे निधन; भारतीय संगीतविश्वातील एका युगाचा अंत

Asha Bhosle : ज्येष्ठ आणि बहुगुणी पार्श्वगायिका आशा भोसले (Asha Bhosle) यांचे वयाच्या ९२ व्या वर्षी निधन झाले. मुंबईतील Breach...

By: Team Navakal
Asha Bhosle
Social + WhatsApp CTA

Asha Bhosle : ज्येष्ठ आणि बहुगुणी पार्श्वगायिका आशा भोसले (Asha Bhosle) यांचे वयाच्या ९२ व्या वर्षी निधन झाले. मुंबईतील Breach Candy रुग्णालय येथे आज त्यांनी अखेरचा श्वास घेतला. त्यांच्या निधनामुळे देशभरात हळहळ व्यक्त होत असून संगीतविश्वावर शोककळा पसरली आहे. त्यांच्या जाण्याने भारतीय संगीतविश्वातील एक सुवर्णयुग संपल्याची भावना व्यक्त होत आहे.

छातीत संसर्ग झाल्याने आशा भोसले यांना काल रात्री उशिरा रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. उपचारादरम्यान त्यांची प्रकृती खालावत गेली. अखेर अवयव निकामी होत गेल्याने त्यांचे निधन झाले, अशी माहिती त्यांचे पुत्र आनंद भोसले यांनी दिली. आशा भोसले यांच्या पार्थिवावर उद्या दुपारी ४ वाजता शिवाजी पार्क येथे शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत. त्याआधी सकाळी ११ ते दुपारी २ या वेळेत लोअर परळ येथील त्यांच्या निवासस्थानी पार्थिव अंत्यदर्शनासाठी ठेवण्यात येणार आहे.

आशा भोसले यांचे चिरंजीव आनंद भोसले म्हणाले की, माझी आई आणि ज्येष्ठ गायिका आशा भोसले यांचे निधन झाले. उद्या त्यांचे पार्थिव त्यांच्या लोअर परळ येथील निवासस्थानी ठेवण्यात येईल. तिथे लोकांना अंत्यदर्शन घेता येईल. त्यानंतर शिवाजी पार्क येथील स्मशानभूमीत त्यांचे अंत्यसंस्कार करण्यात येतील. शासकीय इतमामात त्यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात येतील.

भाजपा मंत्री आशिष शेलार म्हणाले की, आज संपूर्ण देश आणि महाराष्ट्र आकंठपणे दुःखात बुडाला आहे. एका युगाचा अंत झाला आहे, आपल्या आशाताई आपल्यातून निघून गेल्या आहेत. आशाताईंचे असणे हे वर्षानुवर्षे समाधानाची अनुभूती देत होते. आपण दुःखाला कवटाळून लोकांना आनंद देणे ही त्यांची खासियत होती. त्यांचं कर्तृत्व जगाला वेड लावणारे होते. अशा आशाताई आज आपल्यात राहिल्या नाहीत. आता कुटुंबाने सांगितल्याप्रमाणे उद्या त्यांचे पार्थिव त्यांच्या लोअर परळ येथील निवासस्थानी ठेवण्यात येईल. तिथे लोकांना अंत्यदर्शन घेता येईल. त्यानंतर शिवाजी पार्क येथील स्मशानभूमीत त्यांचे अंत्यसंस्कार करण्यात येतील. शासकीय इतमामात त्यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात येतील. त्यांचे नसणे हे आपल्याला आयुष्यभर दुःख देणारे आहे.

सहा दशकांची दैदिप्यमान कारकीर्द

आशा भोसले यांचा जन्म ८ सप्टेंबर १९३३ रोजी महाराष्ट्रातील सांगली येथे झाला. पंडित दीनानाथ मंगेशकर आणि माई मंगेशकर या त्यांच्या आई-वडिलांचे ते पाच अपत्यांपैकी एक होत्या. त्यांनी वयाच्या अवघ्या १० व्या वर्षापासून गायनाला सुरुवात केली होती. आपल्या वेगळ्या आणि चिरतरुण आवाजामुळे त्यांनी जगभरातील संगीतप्रेमींना भुरळ घातली. आशा भोसले या भारतीय चित्रपटसृष्टीतील अत्यंत बहुगुणी आणि दिग्गज पार्श्वगायिका होत्या. लता मंगेशकर यांच्या धाकट्या भगिनी असलेल्या आशा भोसले यांनी सहा दशकांहून अधिक काळ आपल्या आवाजाची जादू रसिकांवर गाजवली.

  Asha Bhosle

१९५० च्या दशकात त्यांनी आपल्या कारकिर्दीची सुरुवात केली आणि अल्पावधीतच स्वतःची वेगळी ओळख निर्माण केली. हिंदीसह मराठी, बंगाली, गुजराती, पंजाबी, तमिळ, तेलुगू अशा अनेक भारतीय भाषांमध्ये त्यांनी हजारो गाणी गायली. त्यांच्या आवाजात विलक्षण लवचिकता असल्याने क्लासिकल, गझल, कॅबरे, पॉप आणि रोमँटिक अशा विविध शैलींमध्ये त्यांनी सहजतेने गाणे सादर केले.

आशा भोसले यांनी अनेक नामवंत संगीतकारांसोबत काम करत असंख्य अजरामर गाणी दिली. त्यामध्ये आर. डी. बर्मन, ओ. पी. नय्यर, सचिन देव बर्मन तसेच लक्ष्मीकांत-प्यारेलाल यांचा समावेश होतो. “दम मारो दम”, “पिया तू अब तो आजा”, “इन आंखों की मस्ती”, “ओम शांती ओम” यांसारखी त्यांची गाणी आजही रसिकांच्या ओठांवर आहेत.

आपल्या प्रदीर्घ कारकिर्दीत त्यांनी अनेक राष्ट्रीय पुरस्कारांसह पद्मविभूषण सारख्या मानाच्या पुरस्कारांनी सन्मानित करण्यात आले. तसेच सर्वाधिक गाणी गाणाऱ्या गायिका म्हणून त्यांची नोंद गिनीज बुकमध्येही झाली आहे. त्या आज आपल्यात नसल्या, तरी त्यांचा आवाज, त्यांची गाणी आणि त्यांनी दिलेला संगीताचा ठेवा कायमच रसिकांच्या मनात जिवंत राहील. त्यांच्या स्वरांची साथ पुढील अनेक पिढ्यांना प्रेरणा देत राहील, यात शंका नाही.

Web Title:
For more updates: , , , stay tuned with Navakal
संबंधित बातम्या