Vijay Wadettiwar – मुंबईत भाजपचा महापौर झाला तर सर्वांच कॉलर टाईट होईल असे मंगलप्रभात लोढा म्हणाले होते. यावर काॅंग्रेस नेते विजय वडेट्टीवार (Vijay Wadettiwar) म्हणाले की, आता अजित पवार गट (Ajit Pawar group) आणि शिंदे गट (Shinde group) हे दोन्ही पक्ष भाजपाच्या ताटाखालचे मांजर बनले आहेत. भाजपा जे सांगेल त्याप्रमाणे हे दोन्ही पक्ष वागतात.
वडेट्टीवार पुढे म्हणाले की, भाजपाला आता कोणी थांबवू शकत नाही, पण अति तिथे माती हे विसरू नये. मुंबईच्या महापौरपदावर त्यांना भाजपाचाच प्रतिनिधी बसवायचा आहे. हा वरून आलेला आदेश आहे. कारण मुंबई ही जगातील आर्थिक राजधानी आहे. येथे जमिनीची किंमत दीड लाख रुपये प्रति स्क्वेअर फूट आहे. अशा परिस्थितीत मुंबईवर ताबा गमावणे भाजपाला परवडणारे नाही, म्हणून दिल्लीतील आकांचा आदेश आहे की कोणत्याही परिस्थितीत मुंबईचा महापौर भाजपाचाच करायचा.
ते पुढे म्हणाले की, त्र्यंबकेश्वर येथे निवडणुकात एका मतासाठी ५० हजार रुपये मोजले गेले. एका मतासाठी एवढी किंमत देणारा पक्ष हा देश किती लुटला असेल हे कळते. सत्ता मिळवण्यासाठी कोणत्याही थराला जायचे, पुन्हा सत्ता मिळवून पैसे लाटायचे आणि देश खिळखिळा करायचा हे प्रकार करून त्यांनी सामाजिक व्यवस्था बिघडवून टाकली आहे.









