Home / राजकीय / विलास शिंदे यांचा शिंदे गटात प्रवेश

विलास शिंदे यांचा शिंदे गटात प्रवेश

नाशिक – उबाठातून (UBT) हकालपट्टी करण्यात आलेले नाशिकचे माजी महानगरप्रमुख विलास शिंदे यांनी आज उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांच्या...

By: Team Navakal
Vilas Shinde joins Shinde group
Social + WhatsApp CTA

नाशिक – उबाठातून (UBT) हकालपट्टी करण्यात आलेले नाशिकचे माजी महानगरप्रमुख विलास शिंदे यांनी आज उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांच्या उपस्थितीत शिवसेना शिंदे( Shivsna Shinde faction) गटात प्रवेश केला. पक्षप्रवेशाच्या वेळी विलास शिंदे यांनी एकनाथ शिंदे यांना चांदीची तलवार भेट दिली.


आज सकाळीच शिंदे यांनी मोठ्या शक्तिप्रदर्शनासह मुंबईकडे प्रस्थान केले होते. त्यांच्या सोबत नाशिकमधील ठाकरे गटाच्या आठ माजी नगरसेवकांनीदेखील शिंदे गटात प्रवेश केला. यामध्ये माजी नगरसेवक संतोष गायकवाड, नयना गांगुर्डे, विष्णुपंत बेंडकुळे, पल्लवी पाटील, उषा शेळके, निलेश ठाकरे, धीरज शेळके आणि निवृत्ती इंगोले यांचा समावेश आहे. या पक्षप्रवेश सोहळ्यामुळे नाशिकमधील उबाठाला मोठे खिंडार पडले आहे. यापूर्वी सुधाकर बडगुजर, माजी मंत्री बबन घोलप, माजी महापौर नयना घोलप आणि अशोक मुर्तडक यांनी भाजपमध्ये प्रवेश केला आहे.

Web Title:
For more updates: , , , , , stay tuned with Navakal
संबंधित बातम्या