Vishakha Subhedar Son – ‘फुबाईफू’, ‘कॉमेडीची बुलेट ट्रेन’, ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ या विनोदी कार्यक्रमातून घराघरात पोहोचलेली मराठी अभिनेत्री विशाखा सुभेदार (Vishakha Subhedar Son) यांच्या कुटुंबावर सध्या मोठे संकट आले आहे. त्यांचा मुलगा अभिनय सुभेदार लंडनला जात असताना मध्यपूर्वेत निर्माण झालेल्या war-like परिस्थितीमुळे त्याचे विमान मार्ग बदलून Kuwait City येथे उतरवण्यात आले. त्यानंतर एअरस्पेस बंद झाल्याने तो गेल्या चार दिवसांपासून तेथेच अडकला असल्याची माहिती समोर आली आहे. या घटनेनंतर अभिनेत्रीने एक भावनिक व्हिडीओ शेअर करत राज्य आणि केंद्र सरकारकडे मदतीचे आवाहन केले आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, अभिनय सुभेदार शिक्षण पूर्ण केल्यानंतर काही दिवसांसाठी भारतात आला होता. त्यानंतर तो पुन्हा higher studies आणि कामासाठी London येथे परत जात होता. कुटुंबीयांनी त्याला विमानतळावर निरोप दिल्याचे photos आणि videos सोशल मीडियावर पोस्ट केले होते. मात्र प्रवासादरम्यान अचानक बदललेल्या परिस्थितीमुळे flight ला emergency diversion घ्यावा लागला आणि विमान कुवेतमध्ये उतरवण्यात आले.
दरम्यान, अभिनेत्रीने सोशल मीडियावर शेअर केलेल्या व्हिडिओमध्ये आपली चिंता व्यक्त केली आहे. त्या म्हणाल्या की, माझा मुलगा लंडनला जात होता. कुवेतमध्ये layover असल्यामुळे त्याचे विमान तिथे उतरले. पण सध्या airspace बंद असल्यामुळे अनेक flights cancel झाल्या आहेत. त्यामुळे माझा मुलगा आणि इतर प्रवासी गेल्या चार दिवसांपासून तिथेच अडकले आहेत. सध्या तिथली situation दिवसेंदिवस गंभीर होत चालली आहे.

अभिनेत्रीने सांगितले की, airline आणि Embassy of India in Kuwait यांच्या माध्यमातून प्रवाशांची तात्पुरती hotel arrangement करण्यात आली आहे. मात्र परिस्थिती किती काळ अशीच राहील याबाबत अनिश्चितता आहे. त्यामुळे त्यांनी तातडीने मदत मिळावी अशी मागणी केली आहे.
यावेळी त्यांनी सरकारला थेट appeal करत म्हटले की, दुबईमध्ये अडकलेल्या भारतीयांना ज्या पद्धतीने सुरक्षितपणे मायदेशी आणण्यात आले, त्याचप्रमाणे कुवेतमध्ये अडकलेल्या भारतीयांसाठीही special arrangement करावी. flights सुरू होत नसतील तर alternative evacuation plan तयार करून भारतीयांना सुरक्षितपणे India मध्ये आणावे
सध्या मध्यपूर्वेतील तणावपूर्ण परिस्थितीमुळे अनेक आंतरराष्ट्रीय उड्डाणांवर परिणाम झाला असून हजारो प्रवासी विविध देशांमध्ये अडकले आहेत. या पार्श्वभूमीवर कुवेतमध्ये अडकलेल्या भारतीयांच्या सुरक्षिततेबाबत चिंता व्यक्त केली जात आहे.

२०२४ मध्ये मुलगा परदेशात जातानाची पोस्ट व्हायरल
२०२४ मध्ये आपल्या मुलाच्या परदेशगमनाच्या वेळी सोशल मीडियावर शेअर केलेली एक भावुक पोस्ट पुन्हा चर्चेत आली आहे. मुलगा पुढील शिक्षणासाठी परदेशात जात असताना आई म्हणून त्यांना आलेल्या भावना त्यांनी त्या पोस्टमधून व्यक्त केल्या होत्या.
त्या वेळी विशाखा सुभेदार यांनी मुलाला विमानतळावरून निरोप देतानाचे photos आणि videos सोशल मीडियावर शेअर केले होते.
यात त्या म्हणल्या की, आज आमचा अबू.. अबुली.. निघाला पुढल्या शिक्षणा साठी लंडन ला.. M. A. In film making (spl direction) करायला Plymouth शहरात..! अबू.. तू जी जी स्वप्न पाहिलीस ती ती पूर्ण होवो..! अतिशय मेहनती आणि झोकून देऊन काम पूर्ण करणार्यातला आहेस तू..!
आत्ता ही जायचं म्हटल्यावर त्यासाठी लागणाऱ्या अनेक गोष्टी तू सक्षम पणे पार पाडल्या.. आणि त्या साठी आम्हला मदत केली नवी मुंबई, वाशी मधल्या wisdome career education ह्या मंडळीने..! जातीने ते लक्ष घालतात..
त्याचे ही खुप खुप आभार…
आणि सगळ्यात आनंदाची गोष्ट अबू.. तुला plymouth युनिव्हर्सिटी कडून मिळालेली स्कॉलरशिप 50% off… 🎖️🎉🎉🎉🎉 तुझ्या मार्कलिस्ट वर, work एक्सपेरियन्स मुळे आणि तुझ्या इच्छाशक्तीन केलीय कमाल आणि ह्यापुढेही तिच मनीषा बाळग… दुरदेशी तू माणसं जोडशीलच कारण अतिशय लाघवी गुणी स्वभावाचा आहेस तू.. जां अबुली जीं ले जिंदगी…आणि खुप छान शिकून ये… तयारीचा गडी होऊनच ये.
बाकी सगळं तुला तर माहितीय,सगळं काही तुझ्याचसाठी.. 😘 माझ्या समजूतदार हुशार बाळा…love u अबुली.. आणि मी आणि बाबा तुला प्रचंड miss करणार.. पण आई बाबा तुझ्या स्वप्नांसाठी कायम तुझ्या पाठीशी उभी राहणार.
https://www.facebook.com/share/v/1CCE7PJLLE
हे देखील वाचा –
इराणसोबतचे युद्ध किती दिवस चालणार? डोनाल्ड ट्रम्प यांचे मोठे विधान
भारत पुन्हा युद्धाची तयारी करत आहे’; पाकिस्तानच्या राष्ट्रपतींचे खळबळजनक विधान











