Home / महाराष्ट्र / Vishwa Hindu Parishad: विश्व हिंदू परिषदेचा इशारा; गरब्यात मुस्लीम व्यक्ती नको

Vishwa Hindu Parishad: विश्व हिंदू परिषदेचा इशारा; गरब्यात मुस्लीम व्यक्ती नको

Vishwa Hindu Parishad : शारदीय नवरात्रोत्सवाची (Navratri festival) सोमवार 22 सप्टेंबरपासून सुरुवात होत आहे. विश्व हिंदू परिषद (VHP) आणि...

By: Team Navakal
Vishwa Hindu Parishad


 Vishwa Hindu Parishad : शारदीय नवरात्रोत्सवाची (Navratri festival) सोमवार 22 सप्टेंबरपासून  सुरुवात होत आहे.  विश्व हिंदू परिषद (VHP) आणि बजरंग दलाने (Bajrang Dal) यंदाही गरबा कार्यक्रमांमध्ये फक्त हिंदूंना प्रवेश देण्यात यावा.  मुस्लीम व्यक्तींना प्रवेश देऊ नये, असे गरबा आयोजकांना सांगितले आहे. बजरंग दल व विश्व हिंदू परिषदेने यावेळी गरबा (Garba) कार्यक्रमावेळी पाळायच्या नवीन अटी आज पत्रकार परिषद घेऊन जाहीर केल्या. त्यात वाराही देवीचे पूजन करणाऱ्यालाच प्रवेश द्यावा, असे सांगितले आहे.


विहिंपने सांगितले की, कार्यक्रमस्थळी येणाऱ्या प्रत्येक व्यक्तीचे आधारकार्ड तपासून त्याला प्रवेश द्या. दांडिया आणि गरबा फक्त हिंदूंसाठीच आहे. त्यामुळे हिंदूंनाच प्रवेश देण्यात यावा. प्रत्येकाने टिळा लावावा. ज्यांची श्रद्धा नाही त्यांना प्रवेश देऊ नये. मुस्लिमाने प्रवेश केला तर त्याला त्वरित पोलिसांच्या हवाली करावे. गरबा हे केवळ नृत्य नसून देवीची आराधना आहे. ते पावित्र्य राखलेच पाहिजे. कार्यक्रमात कोणतीही अलील किंवा असभ्य गाणी वाजवू नयेत.यंदा विहिंपने आणखी एक अट घातली आहे की गरबा उत्सव मंडळात वाराही देवतेचा फोटो लावावा. देवीचे पूजन करूनच प्रवेश घ्यावा.


महाराष्ट्रात 2022, 2023 आणि 2024 मध्येही विहिंपने ‌‘लव्ह जिहाद‌’ रोखण्यासाठी गरब्यात प्रवेश देताना आधारकार्ड तपासण्याचा (Aadhaar card verification)आग्रह धरला होता. मध्य प्रदेशमध्ये (Madhya Pradesh) देखील मुस्लीम व्यक्तींना प्रवेश न देण्याची भूमिका ठेवण्यात आली आहे.


या भूमिकेवर नागपूरचे भाजपाचे पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे(Chandrashekhar Bawankule) म्हणाले की,  गरबा आयोजन करताना गरबा आयोजन समिती अटी-शर्ती ठरवू शकते. समितीने काय अटी ठेवल्या आणि त्या कार्यक्रमाला पोलिसांची परवानगी आहे का, यावरच निर्णय घेणे योग्य ठरते.

उबाठा खासदार  संजय राऊत (MP Sanjay Raut) म्हणाले की, या देशामध्ये अशाप्रकारे धार्मिक, धर्मांध वातावरण निर्माण करण्याचे काम चालू आहे आणि हीच त्यांची रोजी रोटी आहे. मी अगदीच सर्वधर्मसमभावाच्या गोष्टी कधीच करणार नाही. हे महाराष्ट्राला आणि देशाला भूषणावह नाही.

काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार (Vijay Wadettiwar)म्हणाले की,मुस्लिमांना गरब्यात प्रवेश न देण्याचा मुद्दा समाजामध्ये दरी निर्माण करून धर्माच्या नावावर राजकारण करण्याचा प्रयत्न आहे. विश्व हिंदू परिषद काही नव्याने बोलत नाही देशातील वातावरण दूषित करून सत्तेसाठी वाट्टेल त्या स्तरावर भाजपाच्या संघटना काम करतात.


हे देखील वाचा –

Amazon Sale: Samsung च्या ‘या’ स्मार्टफोनवर बंपर डिस्काउंट; हजारो रुपयांची होईल बचत

Navratri 2025 Colours: नवरात्रीत कोणत्या दिवशी कोणता रंग? पाहा संपूर्ण यादी

महाराष्ट्रात पहिल्यांदाच फॉर्म्युला नाईट स्ट्रीट रेस, जाणून घ्या कुठे होणार आणि कधी?

Web Title:
संबंधित बातम्या