Home / महाराष्ट्र / Vivek Kaloti : स्वीकृत नगरसेवक निवडीवरून मुख्यमंत्र्यांचे मामेभाऊ नाराज

Vivek Kaloti : स्वीकृत नगरसेवक निवडीवरून मुख्यमंत्र्यांचे मामेभाऊ नाराज

Vivek Kaloti : अमरावती महापालिकेत स्वीकृत नगरसेवकांची निवड झाल्यानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे मामेभाऊ विवेक कलोती यांनी फेसबुकवर नाराजी व्यक्त...

By: Team Navakal
Social + WhatsApp CTA
Vivek Kaloti : अमरावती महापालिकेत स्वीकृत नगरसेवकांची निवड झाल्यानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे मामेभाऊ विवेक कलोती यांनी फेसबुकवर नाराजी व्यक्त केली.अमरावती महापालिकेच्या  सर्वसाधारण सभेत एकूण  8 स्वीकृत नगरसेवकांची नावे जाहीर करण्यात आली. भाजपाकडून 2  जणांना स्वीकृत नगरसेवकपद मिळाले. त्यामध्ये प्रशांत देशपांडे आणि संजय तिरथकर यांचा  समावेश आहे. प्रशांत देशपांडे यांच्या निवडीवरून विवेक कलोती नाराज आहेत. ‘उमेदवारी न मिळाल्याने घरात बाईसारखे रुसून बसणार्‍या आणि पक्षाच्या उमेदवाराच्या विरोधात काम करणार्‍यांना बक्षीस’ असे विवेक कलोती यांनी त्यांच्या फेसबुक पोस्टमध्ये म्हटले.


विवेक कलोती यांनी अमरावती महापालिकेची निवडणूक लढवली होती. त्यात त्यांचा पराभव झाला होता. त्यामुळे ते स्वीकृत नगरसेवक पदासाठी इच्छुक होते. मात्र त्यांना डावलण्यात आले. कलोती यांनी सांगितले की, मी नाराज आहे असे म्हणता येणार नाही तर मी सत्यतेवर मत व्यक्त केले. महापालिका निवडणुकीत तिकीट मिळाले नाही म्हणून देशपांडे हे घरी बसून राहिले होते. स्वत: मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी त्यांच्या घरी जाऊन मनधरणी केली. पण त्यानंतरही अंबापेठमधील पक्षाच्या चार उमेदवारांच्या प्रचाराचे काम त्यांनी धडपणे केले नाही. आता कुणाचा तरी इगो जपण्यासाठी हे पद पाच वर्षे त्यांना देण्यात आले असे माझे स्पष्ट मत आहे.

Web Title:
For more updates: , , , stay tuned with Navakal
संबंधित बातम्या