पालघर – मतदार यादीत देशभर गोंधळ असल्याचे म्हणत बहुजन विकास आघाडीचे (Bahujan Vikas Aghadi)अध्यक्ष हितेंद्र ठाकुर (Hitendra Thakur)यांनी काँग्रेस नेते राहुल गांधी यांना पाठिंबा दिला आहे. पालघर जिल्ह्यातील नालासोपारा (Nalasopara constituency of Palghar district)मतदारसंघात मतदार यादी भाग क्रमांक २८६ मध्ये सुषमा गुप्ता (३९) या महिलेचे तब्बल सहा वेळा नाव आहे.
या प्रकरणी माजी नगरसेवक अतुल सालुंखे (Former corporator Atul Salunkhe)यांनी १८ मार्च २०२५ ला निवडणूक आयोगाकडे (Election Commission)पत्रव्यवहार केला होता. मात्र आयोगाने कोणतीही कारवाई केली नाही. माजी नगरसेवक अतुल सालुंखे यांनी सांगितले की,या प्रभागात जीवदानी माता चाळ (Jivdani Mata Chawl) अशी इमारत नाही. अनेक नावे दुबार आणि दुसऱ्या प्रभागाची नावे या प्रभागात आहेत. निवडणूकीच्या मतदार याद्यात मोठ्या प्रमाणात भोंगळ कारभार सुरु आहे.
या प्रकरणावर बहुजन विकास आघाडीचे नेते हितेंद्र ठाकूर यांनी राहुल गांधी यांना पाठिंबा देत म्हटले की,नालासोपारा मतदारसंघात ७५ हजार मतदान होत नाही. तेथे ७५ हजार मतदान वाढले. पूजा सिंग – ६३ ,अखिलेश सिंग -४७ आणि सुनील यादव ५३ वेळा नाव आहे. परप्रांतीय नावे मतदार यादीत कशी वाढत आहेत ? ७५ हजार मतदार वाढले आणि सुमारे २५ हजार नावे (roughly 25,000 were removed)काढली. देशभर हेच सुरु आहे. त्यावर काय चर्चा करायची? ज्यांनी प्रत्यक्ष जाऊन ६ वेळा नावे नोंदवली त्यांची नावे यादीत नाही. मात्र यांची अनेकवेळा नावे येतात. यावर संशय घ्यायचा नाही का ?नाव नोंदणीसाठी बोगस यंत्रणा आहे. ज्यांच्याकडे प्रत्यक्ष जाऊन नोंद केलेल्या नावांची नोंदणी नाही. मात्र ऑनलाईन नोंदलेली नावे आहेत. यंत्रणा झोपलेली आहे का ?ते परस्पर नाव नोंद करत आहे का ?