मुंबई -वडाळा ते कासारवडवली या मेट्रो ४ (Wadala–Kasarvadavali Metro 4)मार्गिकेचे काम वेगाने सुरू असून, आतापर्यंत सुमारे ८४.५ टक्के काम पूर्ण झाले आहे. मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाने (MMRDA) घाटकोपर पूर्व भागातील पंतनगर–घाटकोपर (Pantnagar–Ghatkopar)बस स्थानकावर ४५० टन वजनाचा स्टील स्पॅन बसवण्याचे काम पूर्ण केले.
५८ मीटर लांब (58 meters long), ३.१ मीटर उंच आणि ४५० टन (450 tons)वजनाचा हा स्पॅन पाच स्टील गर्डरपासून बनवण्यात आला आहे. या मार्गिकेची एकूण लांबी ३२.३२ किलोमीटर असून, ३२ स्थानके उभारण्यात येणार आहेत. प्रकल्पासाठी १४,५४९ कोटी रुपयांचा खर्च अपेक्षित होता. एकूण पाच पॅकेजमध्ये काम सुरु असून, या मार्गिकेचे काम २०१८ मध्ये सुरू झाले.
एमएमआरडीएच्या २०२० च्या नियोजनानुसार हा प्रकल्प ऑक्टोबर २०२२ पर्यंत (2020 schedule)पूर्ण होणे अपेक्षित होते. पण कोरोना काळात लॉकडाऊनसह इतर कारणांमुळे काम संथ झाले. शिवाय पॅकेज(Packages) ८, पॅकेज १०आणि पॅकेज १२ चे काम कंत्राटदारांच्या आर्थिक अडचणींमुळे काही महिन्यांपासून ठप्प होते. त्यातून काम रखडले असले, तरी सध्या एमएमआरडीएने प्रकल्पाला पुन्हा गती दिली आहे.सध्या या मार्गिकेचा पहिला टप्पा (first phase)लवकरात लवकर वाहतुकीसाठी खुला करण्याचे प्रयत्न सुरू आहेत.
ठाण्यातील बहुप्रतीक्षित मेट्रो सेवेची चाचणी पुढील महिन्यात घेण्याचे प्रयत्न सुरू असून, डिसेंबरपर्यंत पूर्ण सेवा सुरू होण्याची शक्यता असल्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Deputy Chief Minister Eknath Shinde.)यांनी सांगितले.