Wadettiwar vs Bhujbal : अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ (Chhagan Bhujbal) यांनी काल बीडच्या ओबीसी एल्गार मेळाव्यातून काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार (Vijay Vadettiwar) यांच्यावर टीका केली. एक व्हिडिओ दाखवत वडेट्टीवार मराठा आंदोलक नेते मनोज जरांगेंची (Manoj Jarange) बाजू घेत आहेत असा दावाच भुजबळ यांनी केला. यावरून आज विजय वडेट्टीवार यांनी पत्रकार परिषद घेत भाजपाच्या इशाऱ्यावर भुजबळांनी मला लक्ष्य केले, असा आरोप केला.
विजय वडेट्टीवार म्हणाले की, ओबीसींना आरक्षण मिळवण्यासाठी सर्व पक्षांनी ऐक्याने काम करावे लागेल. पण काहीही संबंध नसताना भाजपाच्या इशाऱ्यावर भुजबळांनी मला लक्ष्य केले. माझ्या नागपूरच्या मेळाव्यात प्रचंड गर्दी झाली. ही गर्दी पाहून भाजपा घाबरली. मला लक्ष्य करून ओबीसींना न्याय मिळत असेल किंवा २ सप्टेंबरचा शासन निर्णय रद्द होत असेल तर मी भुजबळांच्या पाया पडेन आणि त्यांचे आशीर्वाद घेईन.
पुढे ते म्हणाले की, कालच्या सभेत माझा व्हिडिओ दाखवून भुजबळांना काय साध्य करायचे आहे? अंबडच्या सभेत कोयता काढण्याची भाषा झाली. आरक्षणाच्या लढाईत कोयता काढून आरक्षण मिळणार आहे का? आपल्याला जे मिळवायचे आहे ते संवैधानिक मार्गाने मिळवले पाहिजे.
हे देखील वाचा –
असुरक्षितता! स्वेच्छानिवृत्तीच्या मागणीकडे दुर्लक्ष; मध्य रेल्वेच्या लोको रनिंग कर्मचाऱ्यांचे आंदोलन
मशिदींवरील भोंगे मी काढले! माझाच लढा! किरीट सोमय्यांचा अजब दावा