Home / महाराष्ट्र / Walmik Karad : संतोष देशमुख हत्या प्रकरणी वाल्मिक कराडला तगडा झटका..

Walmik Karad : संतोष देशमुख हत्या प्रकरणी वाल्मिक कराडला तगडा झटका..

Walmik Karad : बीडच्या मस्साजोग येथील सरपंच संतोष देशमुख यांची हत्या निर्दयी आणि मन पिळवटून टाकणारी होती. त्यांच्या हत्येनंतर राज्यात...

By: Team Navakal
Walmik Karad
Social + WhatsApp CTA


Walmik Karad : बीडच्या मस्साजोग येथील सरपंच संतोष देशमुख यांची हत्या निर्दयी आणि मन पिळवटून टाकणारी होती. त्यांच्या हत्येनंतर राज्यात एकच खळबळ उडाली. याचदाम्यान त्यांच्या हत्येचे काही धक्कादायक फोटोही व्हायरल झाले. या हत्येनंतर बीड जिल्हा मात्र चांगलंच प्रसिद्धी जोतात आला. आणि त्यानंतर बीडच्या मारहाणीचे अनेक व्हिडीओ जोरदार व्हायरल झाली. बीडचा बिहार झाला असल्याचे आरोप यादरम्यान करण्यात आले.

संतोष देशमुख हत्या प्रकरणात धनंजय मुंडे यांचे निकटवर्तीय वाल्मिक कराड यांचे नाव आल्याने धनंजय मुंडेंवरही संशयाची सुई वळली अनेक आरोप झाले प्रत्यारोप झाले. पण याच आरोपानंतर धनंजय मुंडे यांना मंत्रिपदाच्या राजीनाम्यासाठी दबाव टाकण्यात आला. अखेर आपल्या आरोग्याचे कारण देत धनंजय मुंडे यांनी मंत्रिपदाचा राजीनामा दिला.

याच दरम्यान मनोज जरांगे पाटील यांनी धनंजय मुंडे यांच्यावर काही आरोपही केले. आणि आता नुकताच नगरपरिषद आणि नगरपंचायतीच्या निवडणुकीचा निकाल लागला त्याता धनंजय मुंडे यांनी या निकालानंतर म्हटले की, जनतेच्या न्यायालयात मी विजयी झालो आहे.

यादरम्यान प्रचारावेळी धनंजय मुंडे यांनी वाल्मिक कराड यांची देखील आठवण काढली. संतोष देशमुख प्रकरणात वाल्मिक कराड सध्या बीडच्या जेलमध्ये आहेत. नुकताच आता मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठाने वाल्मिक कराड यांचा जामीन फेटाळला आहे. संतोष देशमुख खून प्रकरणात वाल्मिक कराड याने मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठात जामिनासाठी अर्ज केला होता. मात्र, हा जामीन अर्ज न्यायालयाकडून फेटाळण्यात आला आहे.

खंडणी, संतोष देशमुख यांचे अपहरण आणि खुनाच्या संभंधित सर्व पुराव्यांवरून वाल्मिक कराडचा सहभाग दिसत असल्याचे मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठाने म्हटले आहे आणि त्यामुळे हा जामीन फेटाळला आहे. मात्र, न्यायालयाने महत्त्वपूर्ण निष्कर्ष नोंदवत आरोपी वाल्मिक कराडचा जामीन अर्ज फेटाळला आहे.

हे देखील वाचा – CM Reaction on Sudhir Mungantiwar : सुधीर मुनगंटीवारांच्या नाराजीवर फडणवीसांची प्रतिक्रिया..

Web Title:
For more updates: , , , stay tuned with Navakal
संबंधित बातम्या