Home / आरोग्य / Walnut Eating Benefits : तुम्ही सुद्धा रोज अक्रोड खाता का? मग हे नक्की वाचा..

Walnut Eating Benefits : तुम्ही सुद्धा रोज अक्रोड खाता का? मग हे नक्की वाचा..

Walnut Eating Benefits : काहींना सुका मेवा आवडतो तर काहींना सुका मेवा आवडत नाही. पण त्यातल्या त्यात जर जास्त कोणतं...

By: Team Navakal
Walnut Eating Benefits

Walnut Eating Benefits : काहींना सुका मेवा आवडतो तर काहींना सुका मेवा आवडत नाही. पण त्यातल्या त्यात जर जास्त कोणतं ड्रायफ्रूट खाल्ल जात असेल तर बदाम आणि अक्रोड. अक्रोड जितक चवीला चांगले आहे तितकेच ते आरोग्यासाठी देखील फायदेशीर मानले जाते. अक्रोडमध्ये प्रामुख्याने ओमेगा ३ फॅटी अ‍ॅसिड, प्रोटीन, फायबर, कॅल्शिअम, लोह आणि अँटी-ऑक्सिडंट्स यासारख्या पोषणतत्त्वांचा समावेश आहे. यामुळे शरीराच्या वेगवेगळ्या अवयवांना ऊर्जा मिळते आणि कित्येक आजारांपासूनही बचाव होणाया मदत मिळते.

अक्रोड कायम भिजवूनच खावे कारण अक्रोडची प्रकृती उष्ण असते अक्रोड न भिजवता खाल्ल्यास पचनाशी संबंधित समस्यांचा सामना आपल्याला करावा लागू शकतो. पोटात गॅस होणे, जळजळणे यासारख्या समस्यांपासून बचाव करण्यासाठी अक्रोड काही वेळासाठी पाण्यात भिजत ठेवा आणि मग त्याचे सेवन करा. यामुळे अक्रोडमधील एंझाइम्स सक्रिय होतात आणि त्यामुळे, शरीराला पोषणतत्त्व शोषून घेण्यास मदत मिळेल. आयुर्वेदामध्येही अक्रोड भिजवून खाण्यास अधिक महत्व आहे. जेणेकरून शरीरावर त्याचे सकारात्मक परिणाम अधिक होतील. उन्हाळ्यातही शरीरातील उष्णता वाढू नये म्हणून देखील अक्रोड भिजवून खावे.

रोज सकाळी सकाळी रिकाम्या पोटी भिजवलेले अक्रोड खाणे अतिशय फायदेशीर ठरेल. कारण पोट रिकामं असते तेव्हा शरीराला पोषणतत्त्व योग्य पद्धतीने शोषून घेण्यास अधिक मदत मिळते. सकाळी अक्रोड खाल्ल्यास यातील ओमेगा ३ फॅटी अ‍ॅसिड, प्रोटीन आणि अन्य पोषणतत्त्व शरीर पूर्णपणे शोषून घेते, ज्यामुळे मेंदूची कार्यक्षमता अधिक वाढण्यास मदत होते आणि दिवसभरात शरीरातील ऊर्जा टिकून राहते. अक्रोडचा तुम्ही नाश्त्यामध्ये देखील समावेश करू शकता. दिवसभरात चार ते सहा अक्रोड खाणे शरीरासाठी पाचक मानले जाते.

उन्हाळ्यामध्ये शरीराला ऊर्जा आणि उष्णतेची आवश्यकता मोठ्या प्रमाणावर असते, अक्रोडद्वारे शरीराला या दोन्ही गोष्टींचा पुरवठा होतो. उन्हाळ्यात अक्रोड खाल्ल्यास हाडे मजबूत राहतात तसेच सांधेदुखी यासारख्या समस्या कमी होण्यास मदत मिळते. अक्रोडमध्ये अँटी-ऑक्सिडंट्स आणि झिंक यासारख्या तत्त्वांचा समावेश असतो, ज्यामुळे शरीराची रोगप्रतिकारकशक्ती मजबूत राहण्यास मदत मिळते.

मेंदूचा विकास आणि कार्यप्रणाली सूरळीत आणि अधिक जलद होण्यासाठी आवश्यक असणारे ओमेगा ३ फॅटी अ‍ॅसिड अक्रोडमध्ये आहे. अक्रोडच्या सेवनामुळे स्मरणशक्ती वाढणे, लक्ष्य केंद्रित होण्यासह मानसिक थकवाही दूर होतो असे मानले जाते.

हृदयाचे आरोग्य निरोगी ठेवण्यामध्ये अक्रोड महत्त्वपूर्ण भूमिका बजावते, यातील पॉली-अनसॅच्युरेटेड फॅटी अ‍ॅसिड आणि अँटी-ऑक्सिडंट्स शरीरातील खराब कोलेस्टेरॉलची पातळी घटवतात आणि चांगल्या कोलेस्टेरॉलची पातळी वाढवण्यास मदत देखील करतात. यामुळे रक्तदाबाची पातळी संतुलित राहण्यास मदत होते आणि हृदयविकारांचा धोका देखील कमी होतो. जी मंडळी नियमित पणे अक्रोड खातात, त्यांच्यामध्ये हृदयविकार आणि पक्षाघात यासारखे आजार कमी प्रमाणात आढळतात.

धकाधकीच्या जीवनामध्ये शरीराची रोगप्रतिकारकशक्ती अक्रोड खाल्याने मजबूत होते. अक्रोडमध्ये व्हिटॅमिन ई, झिंक, मॅग्नेशिअम आणि अँटी-ऑक्सिडंट्स यासारख्या गुणधर्मांचा समावेश असतो, ज्यामुळे शरीराची रोगप्रतिकारकशक्ती अधिक मजबूत होण्यास मदत मिळते.

अक्रोडचे नियमित मर्यादित स्वरुपात सेवन करणे गरजेचे आहे. नियमित तीन ते चारपेक्षा अधिक प्रमाणात अक्रोड खाऊ नये. कारण अक्रोडची प्रकृती हि उष्ण स्वरूपाची असते, ज्यामुळे शरीरात उष्णता अधिक वाढते, तोंड येणे यासह अन्य समस्या उदभवू शकतात.


हे देखील वाचा –

MNS Presentation : उबाठानंतर मनसेचे प्रेझेंटेशन ; राज ठाकरेही मतचोरी उघड करणार

Web Title:
For more updates: , , stay tuned with Navakal
संबंधित बातम्या