Home / महाराष्ट्र / एकनाथ शिंदे दिल्लीत असताना ! राज्यात फडणवीस–पवार बैठक

एकनाथ शिंदे दिल्लीत असताना ! राज्यात फडणवीस–पवार बैठक

मुंबई – उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Deputy Chief Minister Eknath Shinde) दिल्ली दौऱ्यावर गेले असतानाच मुंबईत सह्याद्री अतिथीगृहावर दिवसभर राजकीय हालचालींना...

By: Team Navakal
Fadnavis–Pawar Hold Key Meetings in Mumbai

मुंबई – उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Deputy Chief Minister Eknath Shinde) दिल्ली दौऱ्यावर गेले असतानाच मुंबईत सह्याद्री अतिथीगृहावर दिवसभर राजकीय हालचालींना (political activity) प्रचंड वेग आला. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यात दोन वेळा बैठक झाली. तर माजी मंत्री धनंजय मुंडे, खासदार सुनील तटकरे आणि रुपाली चाकणकर यांच्या उपस्थितीने राष्ट्रवादीतील हालचालींविषयी अनेक प्रश्न निर्माण झाले आहेत.

सकाळी अजित पवार (Ajit Pawar.)यांनी वर्षा बंगल्यावर मुख्यमंत्री फडणवीस यांची भेट घेतली. दोघांमध्ये जवळपास २० मिनिटांची चर्चा झाली. त्यानंतर मुख्यमंत्री फडणवीस सह्याद्री अतिथीगृहात पोहोचताच राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे त्यांच्या भेटीला आले. काही वेळातच अजित पवारही सह्याद्रीवर दाखल झाले. तिघांमध्ये तिथे एक बैठक पार पडली. बैठक सुरू असतानाच माजी कृषी मंत्री धनंजय मुंडे (Dhananjay Munde)ही सह्याद्रीवर पोहोचले. मात्र काही मिनिटांतच ते निघून गेले. लगेचच राष्ट्रवादीच्या महिला प्रदेशाध्यक्षा रुपाली चाकणकर (Rupali Chakankar) सह्याद्रीवर दाखल झाल्या. या बैठकीनंतर सुनील तटकरे (MP Sunil Tatkare.) आणि अजित पवार यांच्यात एक स्वतंत्र बैठक झाली.

दरम्यान धनंजय मुंडे यांनी कालदेखील सह्याद्री (Sahyadri) अतिथीगृहात मुख्यमंत्र्यांची भेट घेतली होती. त्यानंतर संध्याकाळी देवेंद्र फडणवीस यांनी राज्यपाल सी. पी. राधाकृष्णन (Governor C.P. Radhakrishnan)यांची भेट घेतली. या भेटीचे कारण अद्यापही स्पष्ट झाले नाही. तर एकनाथ शिंदे यांनी काल दिल्लीत पोहचताच भाजपाच्या काही वरिष्ठ नेत्यांची (BJP leaders.)भेट घेतली. या सलग भेटींमुळे राज्य मंत्रिमंडळात बदलांचे वारे वाहत असल्याची जोरदार चर्चा सुरू झाली.

Web Title:
संबंधित बातम्या