वायु दलाच्या अधिपत्याखालील जमीन राज्याच्या नावावर करणार? वरुण सरदेसाईंचा सवाल

Will the land under the Air Force in the name of the state?

मुंबई- आज विधानसभेत उबाठाचे (UBT) आमदार वरुण सरदेसाई (MLA Varun Sardesai)यांनी वांद्रे पूर्व मतदारसंघातील वायूदलाच्या अधिपत्याखाली असलेल्या जमिनीचा मुद्दा उपस्थित केला. ते म्हणाले की, ४२ एकर जमिनीवर झोपडीधारक आहेत, त्यांचे प्रश्न अद्यापही अनुत्तरित आहेत. याबाबत सरकारची (Government) ठोस योजना काय आहे? शासन म्हणून तुम्ही काय करत आहेत? मुख्यमंत्र्यांनी (CM Devendra Fadnavis)पाठपुरावा करूनही का उत्तर मिळाले नाही? तुम्ही वायुदलाकडून ही जमीन वापरण्याबाबत ना हरकत आणणार की संपूर्ण जमीन महाराष्ट्राच्या नावावर करणार?

यावर उत्तर देताना मंत्री शंभुराज देसाई (Minister Shambhuraj Desai) म्हणाले की, ही संपूर्ण जमीन भारतीय वायूदलाची आहे. त्यातील ५० टक्के जमीन केंद्र सरकारला (Central Government) आणि ५० टक्के राज्य सरकारला देण्याचा प्रस्ताव सादर झाला होता. त्या प्रस्तावानुसार बायोमेट्रिक (Biometric) सर्वेक्षण करण्यात आले. मात्र, काही झोपडीधारकांनी सर्वेला विरोध केला होता. या प्रकरणात दोन पर्याय समोर ठेवले आहेत. पहिला पर्याय म्हणजे केंद्राच्या मालकीच्या जमिनीवर असलेल्या झोपडपट्ट्यांचे पुनर्वसन करण्यास भारतीय वायूदलाने परवानगी दिल्यास ते शक्य होईल. दुसरा पर्याय म्हणजे प्रधानमंत्री आवास योजनेअंतर्गत या झोपडपट्ट्यांचे पुनर्वसन करता येईल का, याचा विचार करावा लागेल. यासाठी सरकारने केंद्र सरकारकडे पाठपुरावा केला आहे.