Winter Session 2025 : राज्यातील विधानमंडळाचे हिवाळी अधिवेशन नागपूर येथे ८ डिसेंबरपासून १४ डिसेंबरपर्यंत आयोजित केल्याची अधिकृत घोषणा करण्यात आली आहे. या निर्णयाची सूचना दोन्ही सभागृहांच्या व्यवसाय सल्ला समितीकडून आज देण्यात आली.
हिवाळी अधिवेशनाचा कालावधी हा ८ डिसेंबर ते १४ डिसेंबर असणार इतका आहे. सुरुवातीला दोन आठवडे हिवाळी अधिवेशन होईल, अश्या चर्चा होत्या; मात्र, रविवारी कामकाज ठेवून हिवाळी अधिवेशन कालावधी फक्त एका आठवड्यापुरताच मर्यादित ठेवण्यात आला आहे.
महाराष्ट्र हिवाळी अधिवेशन २०२५ साठी अंदाजे तब्ब्ल ९० कोटी रुपये खर्च होणार असल्याच्या चर्चा आहेत. हे अधिवेशनासाठी पूर्वतयारी जसे कि मंत्र्यांचे, आमदारांचे आणि प्रशासकीय अधिकाऱ्यांचे निवास, कार्यालय दुरुस्ती आणि सजावट या कामांसाठी नमूद करण्यात आले आहे. आणि ४० लाख हे आमदार, खासदार आणि त्यांच्या पीएच्या जेवणासाठीच खर्च होणार असलयाच्या चर्चा आहेत.
अधिवेशनाचे स्वरूप हे साप्ताहिक असणार आहे. प्रमुख विधिमंडळीय कामकाज, विभागीय पुनरावलोकन आणि राज्यातील महत्त्वाच्या मुद्यांवर या अधिवेशनात चर्चा होणार आहेत.
हे देखील वाचा – Anganewadi Jatra 2026 : यादिवशी ठरली कोकणातील आंगणेवाडी जत्रा; भराडी देवीच्या कौलाने जत्रेला सुरवात..









