Women’s World Cup : भारताच्या धाकड मुलींनी इतिहास घडवला. महिला क्रिकेटमधील सर्वाधिक ३३९ धावांचा ऐतिहासिक पाठलाग करून भारताने एकदिवसीय विश्वचषकात ऑस्ट्रेलियन महिला संघाची १५ विजयांची मालिका मोडीत काढली. आणि त्यानंतर अखेरच्या सामन्यात भारतीय महिला संघाने दक्षिण आफ्रिकेवर ५२ धावांनी तसेच हरमनप्रीत कौरच्या फौजेने महिनाभर चालू असलेली विश्वविजयाची मोहीम अखेरीस फत्ते केली आहे. भारताच्या महिला क्रिकेट संघाने महिला विश्वचषक २०२५ च्या विजेतेपदावर आपली मोहोर उमटवली. या स्पर्धेच्या अंतिम सामन्यात दक्षिण आफ्रिकेचं आव्हान परतावून लावत भारतीय महिला संघाने पहिल्यांदाच ऐतिहासिक विजय मिळवला आहे. हरमनप्रीत कौरच्या नावाचा गाजावाजा सर्वत्र असल्याचे दिसून येते. कपिल देव, महेंद्रसिंग धोनी, रोहित शर्मा या दिग्गज खेळाडूंच्या गटात आता हरमनप्रीत कौरच्या नावाचा देखील समावेश केला जात आहे.
भारतीय संघाने यापूर्वी २००५ आणि २०१७ मध्ये एकदिवसीय विश्वचषकाची अंतिम फेरी तर गाठली मात्र विजय प्राप्त करण्यात ते अपयशी ठरले. आता घरच्या मैदानावर खेळताना मात्र भारताच्या धाकड मुलींनी विजयाची परिसीमा पार केली. दरम्यान, विश्वविजेत्या भारतीय महिला संघावर आता बक्षीसांचा अफाट वर्षाव होत आहे. भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने संघाला रोख ५१ कोटी रुपये देखील जाहीर केले आहेत.

भारतीय महिला संघ हा मागच्या आठवडाभरापासून नवी मुंबईतच होता. साखळी लढतीतील अखेरचा सामना बांगलादेशविरुद्ध आणि उपांतिम फेरीचा सामना ऑस्ट्रेलियाविरुद्ध ज्या डॉ. डी. वाय. पाटील स्टेडियमवर खेळला, त्याच मैदानावर काल भारताला अंतिम लढत खेळण्याची संधी मिळाली. येथील परिस्थिती आणि खेळपट्टी याची भारतीय संघाला पूर्णपणे कल्पना होती त्यामुळे याचा फायदा देखील भारतीय संघाला झाला. उपांत्य लढतीतील विजयानंतर अमनजोत कौरने प्रतिक्रिया दिली होती कि ‘‘विविध शहरांत खेळताना बराच वेळ प्रवासात वाया जात असतो. आता सलग तीन सामने एकाच ठिकाणी खेळायला मिळाल्याने आम्हाला प्रवासाचं फारस टेन्शन न्हवत. त्यामुळे आम्हाला स्वतःसाठी मेहनत घेण्यासाठी, तसेच नेट्समध्ये सरावासाठी अधिकचा वेळ मिळाला,’’असे ती म्हणाली. भारताच्या कालच्या दणदणीत विजयचा हे देखील एक मुख्य कारण असू शकत.
भारतीय संघाला यंदाच्या स्पर्धेत अनेक चढ-उतारांना सामोरे जावे लागले होते. यामध्ये पावसामुळे एक सामना रद्द देखील झाला होता. भारतीय संघाने साखळी फेरीत सातपैकी तीन सामने जिंकले त्यामुळे भारताचा आत्मविश्वास देखील तितकाच दृढ झाला होता. जेमिमा रॉड्रिग्ज आणि कर्णधार हरमनप्रीत कौर यांच्या झुंजार खेळींनी भारताला एकवेळ अशक्यप्राय वाटणारा विजय याआधी उपांत्य फेरीत मिळवून दिला होता. इतक्या आव्हानात्मक परिस्थितीतून जबरदस्त असा मार्ग काढल्याने भारतीय खेळाडूंचा आत्मविश्वास कमालीचा वाढला होता. आणि यायचेच फळ म्हणून कि काय कालच्या सामन्यात दक्षिण आफ्रिकेलाही धूळ त्यांनी धूळ चारली.
या सामन्यात कमालीच्या फिल्डिंगसह टीम इंडियाला पहिली विकेट मिळवून देणाऱ्या अमनजोत कौरचा कॅच मॅचला टर्निंग पॉइंट ठरला होता. २९९ धावांचा बचाव करताना भारतीय संघाने दक्षिण आफ्रिकेचा अर्धा संघ पॅव्हिलियनमध्ये पाठवला होता. पण जोपर्यंत लॉरा वॉल्व्हार्ड मैदानात खेळत होती तोपर्यंत मॅच दक्षिण आफ्रिकेच्या हातातून खेचणे काही केल्या शक्य न्हवते. आणि कर्णधार हरमनप्रीत कौरवर याचा तीव्र दबाव देखील होता, परंतु ४२ व्या षटकात लॉरानं एक मोठा फटका मारला आणि अमनजोत कौर हीन तिचा कॅच घेण्यासाठी बॉलवर आली. तिच्या हातून चेंडू निसटल्यावर तिसऱ्या प्रयत्नात तिने अखेर हा झेल पूर्ण केला अन् भारतीय संघाच्या विजयातील मोठा अडसर दूर झाला.
पाच वर्ल्ड कप स्पर्धेत खेळणारी हरमनप्रीत कौर हि भारताची धाकडं गर्ल पहिल्यांदाच वनडे वर्ल्ड कप स्पर्धेत भारतीय संघाचे नेतृत्व करत होती. ती भारतीय महिला संघाला वर्ल्ड कप जिंकून देणारी आणि भारतीयांचं नाव मोठं करणारी पहिली महिला कर्णधार ठरली आहे. दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या फायनलमध्ये हरमनप्रीतनं शेवटची विकेट मिळवून मॅच जिंकून देणारा विश्लषणीय कॅच घेतला. या विजयानंतर संघातील सर्व खेळाडू भावूक झाल्याचेसुद्धा दिसून आले. भारताचे अनेक वर्षाचे स्वप्न साकार झाले.
हे देखील वाचा –









