Home / महाराष्ट्र / Yellow Alert : राज्यात पावसाचा इशारा ! अनेक जिल्ह्यांना यलो अलर्ट

Yellow Alert : राज्यात पावसाचा इशारा ! अनेक जिल्ह्यांना यलो अलर्ट

Yellow Alert – गेले चार दिवस सुरू असलेल्या मुसळधार पावसाने (Heavy rains)राज्यभर थैमान घातले आहे. पुढील तीन दिवस महाराष्ट्रातील बहुतांश...

By: Team Navakal
yellow alert

Yellow Alert – गेले चार दिवस सुरू असलेल्या मुसळधार पावसाने (Heavy rains)राज्यभर थैमान घातले आहे. पुढील तीन दिवस महाराष्ट्रातील बहुतांश ठिकाणी पावसाचा जोर कायम राहणार असल्याचा अंदाज हवामान विभागाने (Meteorological Department)वर्तवला आहे. मराठवाडा (Marathwada) व मध्य महाराष्ट्रात (central Maharashtra) वादळी वाऱ्यासह जोरदार पावसाची शक्यता आहे.

हवामान विभागाने उद्या सिंधुदुर्ग, रत्नागिरी, रायगड, पुणे,सातारा, नाशिक (Nashik) , अहिल्यानगर, बीड, सोलापूर , धाराशिव आणि छत्रपती संभाजीनगर (Chhatrapati Sambhajinagar)जिल्ह्यांना येलो अलर्ट दिला आहे. तर १९ सप्टेंबर रोजी नाशिक, छत्रपती संभाजीनगर, अहिल्यानगर , बीड(Beed), जालना, परभणी, लातूर, धाराशिव व सोलापूर जिल्ह्यांसाठी यलो अलर्ट जारी करण्यात आला आहे. २० सप्टेंबरला बहुतांश जिल्ह्यांत हलक्या पावसाची शक्यता आहे.


दरम्यान, ऑगस्ट आणि सप्टेंबर महिन्यात झालेल्या अतिवृष्टीमुळे तब्बल ३० जिल्ह्यांतील शेतकरी मोठ्या आर्थिक संकटात सापडले आहेत. पूर व अतिवृष्टीमुळे मोठ्या प्रमाणावर पिकांचे नुकसान झाले असून, कृषीमंत्री दत्तात्रय भरणे यांच्या माहितीनुसार या दोन महिन्यांत राज्यातील १७,८५,७१४ हेक्टर (hectares) (४२,८४,८४६ एकर) क्षेत्र अतिवृष्टीमुळे बाधित झाले आहे.


हे देखील वाचा

दिल्लीतील ऐतिहासिक लाल किल्ला पडतोय ‘काळा’; कारण काय? वाचा

भारतातल्या करव्यवस्थेत मोठा बदल, ‘GST 2.0 India’ मुळे गरजेच्या वस्तूंवर दिलासा

Royal Enfield ने केली मोठी घोषणा; बुलेटसह अनेक बाईक्सच्या किमतीत मोठी कपात

Web Title:
संबंधित बातम्या