Home / महाराष्ट्र / Ajit Pawar: जिप, पालिका निवडणुका लांबणीवर?अजित पवार यांचेच जाहीर वक्तव्य

Ajit Pawar: जिप, पालिका निवडणुका लांबणीवर?अजित पवार यांचेच जाहीर वक्तव्य

Ajit Pawar- नगर परिषद, नगर पंचायत निवडणुकीच्या प्रचाराला आठवडा उरला असतानाच राज्यातील जिल्हा परिषद निवडणुका आणि त्यानंतर होणार्‍या पालिका निवडणुका...

By: Team Navakal
Ajit Pawar
Social + WhatsApp CTA

Ajit Pawar- नगर परिषद, नगर पंचायत निवडणुकीच्या प्रचाराला आठवडा उरला असतानाच राज्यातील जिल्हा परिषद निवडणुका आणि त्यानंतर होणार्‍या पालिका निवडणुका लांबणीवर पडण्याची शक्यता आहे. स्वतः उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar)यांनी धाराशिव जिल्ह्यातील नळदूर्ग येथील जाहीर सभेत याबद्दलचे संकेत दिले.


नळदूर्ग नगर परिषदेच्या प्रचार सभेत उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सांगितले की, राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका फेब्रुवारी 2022 मध्ये व्हायला हव्या होत्या. पण त्या 2022, 2023, 2024 नंतर आता 2025 मध्येही पुढे ढकलल्या जाऊ शकतात. कार्यकर्त्यांना वाट बघावी लागत आहे. अजूनही या निवडणुका पूर्ण होतील यावर प्रश्न आहेच. मंगळवारी सुप्रीम कोर्टामध्ये ओबीसी आरक्षणाशी संबंधित सुनावणी होणार आहे. यावेळी निर्णय झाला नाही किंवा आरक्षण लॉटरी पुन्हा करावी लागणार अशी वेळ आली तर जिल्हा परिषदेच्या निवडणुका पुढे जाण्याची शक्यता आहे . पण निवडणुका जाहीर करण्याचा अधिकार आयोगाला आहे. त्याबद्दल मला बोलण्याचा अधिकार नाही. मात्र, मला वकिलांनी जे सांगितले ते तुम्हाला सांगतो आहे.


सर्वोच्च न्यायालयाने ओबीसी आरक्षणासंदर्भात 50 टक्क्यांची आरक्षण मर्यादा न ओलांडण्याचा आदेश दिला होता. पण त्याचा चुकीचा अर्थ लावून नगर पंचायत व परिषद निवडणुकीसाठी अधिकार्‍यांनी चुकीच्या पद्धतीने आरक्षण लागू केल्यामुळे ते 50 टक्क्यांपेक्षा जास्त झाल्याचा दावा करीत कोर्टात याचिका दाखल करण्यात आली. यावर येत्या मंगळवारी पुन्हा सर्वोच्च न्यायालयात सुनावणी होणार आहे. न्यायालयाने आरक्षण मर्यादेबद्दल सरकार विरोधात निकाल दिला तर निवडणुकीची प्रक्रिया पुन्हा लांबणीवर पडू शकते. त्याचा नगर पंचायत आणि नगर परिषद निवडणुकीवरही परिणाम होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

मते द्या, अन्यथा निधी नाही!
अजित पवारांची धमकी
बारामती तालुक्यातील माळेगाव येथील सभेत बोलताना अजित पवारांनी केलेल्या वक्तव्यामुळे खळबळ उडाली आहे. ते म्हणाले की, येथील नगरपंचायत माझ्या विचारांची नसेल तर माझे फारसे अडणार नाही, पण माझ्या विचारांचे लोक असतील तर निधी कसा वापरायचा हे मला सांगता येईल. यासाठी आम्ही ज्या 18 लोकांचे पॅनल उभे केले आहे, त्यांना निवडून द्या. तुम्ही सांगितलेले सगळे मी द्यायला तयार आहे. पण तुम्ही काट मारली, तर मीपण काट मारणार. तुमच्या हातामध्ये मते द्यायचे आहे आणि माझ्या हातात निधी द्यायचा आहे. त्यामुळे तुम्ही बघा, काय करायचे ते.

——————————————————————————————————————————————————

हे देखील वाचा –

आण्णा लिहिलेल्या गाडीची धडक; मनोज जरांगेंच्या समर्थकाचा मृत्यू

अर्णवच्या आत्महत्येला ठाकरे जबाबदार! नवी खेळी! भाजपाचे आंदोलन! मराठी भाषेचा मुद्दा उलटवला

Web Title:
For more updates: , , , stay tuned with Navakal
संबंधित बातम्या