71व्या राष्ट्रीय चित्रपट पुरस्कारांची घोषणा! 12th Fail ठरला सर्वोत्कृष्ट सिनेमा, तर ‘हा’ मराठी चित्रपट ठरला सर्वोत्कृष्ट

71st National Film Awards Full List

71st National Film Awards Full List: 71 व्या राष्ट्रीय चित्रपट पुरस्कारांची (71st National Film Awards Full List) घोषणा करण्यात आली आहे. देशभरातील चित्रपट, अभिनेते आणि तंत्रज्ञांना त्यांच्या योगदानाबद्दल या पुरस्कारांनी सन्मानित करण्यात आले. 2023 साठीच्या चित्रपटांसाठी यावर्षी राष्ट्रीय पुरस्कारांची घोषणा झाली आहे.

यामध्ये शाहरुख खान (Shah Rukh Khan), राणी मुखर्जी (Rani Mukerji) आणि विक्रांत मॅसी (Vikrant Massey) यांना सर्वोत्कृष्ट अभिनेत्याचे पुरस्कार मिळाले आहेत. तसेच, ‘हनुमान’ (HanuMan) आणि ‘पार्किंग’ (Parking) यांसारख्या प्रादेशिक चित्रपटांनीही बाजी मारली आहे.

12th फेल या चित्रपटाला सर्वोत्कृष्ट चित्रपटाचा बहुमान मिळाला. या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवरही मोठी कमाई केली होती. यावर्षी हिंदी चित्रपटसृष्टीसह दाक्षिणात्य आणि मराठी चित्रपटांनाही विविध श्रेणींमध्ये पुरस्कार मिळाले आहेत.

खालीलप्रमाणे फिचर फिल्म (Feature Film) आणि नॉन-फिचर फिल्म (Non-Feature Film) या दोन्ही श्रेणींमधील विजेत्यांची संपूर्ण यादी आहे.

फिचर फिल्म श्रेणीतील विजेते

  • सर्वोत्कृष्ट चित्रपट: 12th Fail
  • सर्वोत्कृष्ट दिग्दर्शन: सुदीप्तो सेन (The Kerala Story)
  • राष्ट्रीय, सामाजिक मूल्यांना प्रोत्साहन देणारा सर्वोत्कृष्ट चित्रपट: सॅम बहादूर (Sam Bahadur)
  • सर्वाधिक लोकप्रिय आणि उत्कृष्ट मनोरंजन देणारा चित्रपट: रॉकी और राणी की प्रेम कहानी (Rocky Aur Rani Kii Prem Kahaani)
  • सर्वोत्कृष्ट पदार्पण चित्रपट: आत्मपाम्फ्लेट (Aatmapamphlet)

अभिनेता आणि अभिनेत्रीअभिनेता आणि अभिनेत्री

  • सर्वोत्कृष्ट अभिनेता: शाहरुख खान (Jawan) आणि विक्रांत मॅसी (12th Fail)
  • सर्वोत्कृष्ट अभिनेत्री: राणी मुखर्जी (Mrs Chatterjee vs Norway)
  • सर्वोत्कृष्ट सहायक अभिनेता: विजयराघवन (Pookalam), मुथुपेट्टई सोमु भास्कर (Parking)
  • सर्वोत्कृष्ट सहायक अभिनेत्री: उर्वशी (Ullozhukku), जानकी बोडीवाला (Vash)
  • सर्वोत्कृष्ट बालकलाकार: सुकृती बंदिरेड्डी (Gandhi Thatha Chettu), कबीर खंडाणे (Gypsy), त्रिशा तोशार, श्रीनिवास पोकळे, भार्गव (Naal 2)

भाषिक चित्रपट

  • सर्वोत्कृष्ट मराठी चित्रपट: श्यामची आई
  • सर्वोत्कृष्ट हिंदी चित्रपट: कठल (Kathal)
  • सर्वोत्कृष्ट तेलुगू चित्रपट: भगवंत केसरी (Bhagavanth Kesari)
  • सर्वोत्कृष्ट तमिळ चित्रपट: पार्किंग (Parking)
  • सर्वोत्कृष्ट मल्याळम चित्रपट: उल्लोझुक्कू (Ullozhukku)
  • सर्वोत्कृष्ट कन्नड चित्रपट: कंदीलु (Kandeelu)
  • सर्वोत्कृष्ट बंगाली चित्रपट: डीप फ्रिज (Deep Fridge)
  • सर्वोत्कृष्ट पंजाबी चित्रपट: गोड्डय गोड्डय छा (Godday Godday Chaa)
  • सर्वोत्कृष्ट ओडिया चित्रपट: पुष्करा (Pushkara)
  • सर्वोत्कृष्ट आसामी चित्रपट: रोंगटापू 1982 (Rongatapu 1982)

तंत्रज्ञान आणि संगीत

  • सर्वोत्कृष्ट संगीत दिग्दर्शन: जी. व्ही. प्रकाश कुमार (Vaathi), हर्षवर्धन रामेश्वर (Animal)
  • सर्वोत्कृष्ट पार्श्वगायिका: शिल्पा राव (Jawan मधील ‘चलेया’ गाण्यासाठी), रोहित (Baby मधील ‘प्रेमिस्थुन्ना’ गाण्यासाठी)
  • सर्वोत्कृष्ट सिनेमॅटोग्राफी: प्रशांतनु महापात्रा (The Kerala Story)
  • सर्वोत्कृष्ट संपादन: मिथुन मुरली (Pookkaalam)
  • सर्वोत्कृष्ट संवाद: दीपक किंगराणी (Sirf Ek Bandha Kaafi Hai)
  • सर्वोत्कृष्ट गीतकार: कासरला श्याम (Balagam मधील ‘ऊरु पल्लेतुरु’ गाण्यासाठी)
  • सर्वोत्कृष्ट नृत्यदिग्दर्शन: वैभवी मर्चंट (Rocky Aur Rani Kii Prem Kahaani मधील ‘ढिंढोरा बाजे रे’ गाण्यासाठी)
  • सर्वोत्कृष्ट वेशभूषा: सचिन, दिव्या, निधी (Sam Bahadur)
  • सर्वोत्कृष्ट मेकअप: श्रीकांत देसाई (Sam Bahadur)

नॉन-फिचर फिल्म श्रेणीतील विजेते

  • सर्वोत्कृष्ट नॉन-फिचर फिल्म: फ्लावरिंग मॅन (Flowering Man)
  • सर्वोत्कृष्ट दिग्दर्शन (नॉन-फिचर): पियुष ठाकूर (The First Film)
  • सर्वोत्कृष्ट लघुपट: गिद्ध द स्कॅव्हेंजर (Giddh The Scavenger)
  • सर्वोत्कृष्ट माहितीपट: गॉड व्हल्चर अँड ह्युमन (God Vulture and Human)
  • सामाजिक आणि पर्यावरणीय मूल्यांना प्रोत्साहन देणारा सर्वोत्कृष्ट नॉन-फिचर फिल्म: द सायलेंट एपिडेमिक (The Silent Epidemic)