Home / मनोरंजन / Amitabh Bachchan : अमिताभ बच्चन यांचा मराठी शिकण्याचा प्रयत्न; नेटकऱ्यांचा धमाल प्रतिसाद

Amitabh Bachchan : अमिताभ बच्चन यांचा मराठी शिकण्याचा प्रयत्न; नेटकऱ्यांचा धमाल प्रतिसाद

Amitabh Bachchan : बॉलिवूडचे शहेनशहा अमिताभ बच्चन (Amitabh Bachchan) सोशल मिडिया (Social Media) वर नेहमीच सक्रिय असतात. अलीकडे त्यांनी मराठी...

By: Team Navakal
Amitabh Bachchan

Amitabh Bachchan : बॉलिवूडचे शहेनशहा अमिताभ बच्चन (Amitabh Bachchan) सोशल मिडिया (Social Media) वर नेहमीच सक्रिय असतात. अलीकडे त्यांनी मराठी (Marathi) शिकण्याबाबत एक पोस्ट केली, त्यात त्यांनी म्हटले की, कोणीतरी मला सांगितले की तुला मराठी (Marathi) येत नाही आणि तू इतक्या वर्षांपासून मुंबई (Mumbai) मध्ये राहतोस. हे खरे आहे, पण ते शिकण्याचा प्रयत्न कर, हे शिकणे देखील एक सलाम आहे.

या पोस्टवर चाहत्यांनी (Fans) उत्स्फूर्त प्रतिक्रिया दिल्या. काहींनी त्यांच्या प्रयत्नाचे कौतुक केले, तर काहींनी भाषेशी संबंधित सामाजिक विचार मांडले. एका महिला युजरने लिहिले की, खूप छान… जमेल तुम्हाला. आज पहिल्यांदाच तुमच्या पोस्टला लाईक कमेंट करायची इच्छा झाली. तर काहींनी म्हटले की, मराठी सिनेमासाठी मराठी शिकणे आवश्यक आहे. महाराष्ट्रात मराठीच्या मुद्द्यावरून वाद सुरु असताना या पोस्टवर कमेंट करताना एकजण म्हणाला की, आजकाल भाषेच्या नावाखाली अत्याचार करण्याची प्रथाच बनली आहे. तुम्ही जसे आहात तसेच राहिले पाहिजे. ज्याला कोणतीही भाषा शिकायची आहे त्याने ती स्वेच्छेने शिकावी, जबरदस्तीने नाही. हिमाचलमध्ये या, कोणीही तुम्हाला पहाडीत बोलण्यास सांगणार नाही.


ताज्या बातम्यांसाठी येथे क्लिक करून नवाकाळचे WhatsApp Channel फॉलो करा


हे देखील वाचा –

काशी विश्वनाथ मंदिर कर्मचारी राज्य सेवक दर्जा ! पगार तिपटीने वाढणार

चोक्सीला तुरुंगात १४ सुविधा भारताचे बेल्जियमला आश्वासन

नवी मुंबई विमानतळाला नाव द्या; रविवारी दिबा मानवंदना कार रॅली

Web Title:
संबंधित बातम्या