Home / मनोरंजन / Amitabh Bachchan : अमिताभ बच्चन यांची मोठी रिअल इस्टेट डील! 13 वर्षांत 47% नफा; कोट्यावधींच्या फ्लॅट्स केली विक्री

Amitabh Bachchan : अमिताभ बच्चन यांची मोठी रिअल इस्टेट डील! 13 वर्षांत 47% नफा; कोट्यावधींच्या फ्लॅट्स केली विक्री

Amitabh Bachchan Property : आजकाल सामान्य गुंतवणूकदारांपासून ते बॉलिवूडमधील सेलिब्रिटींपर्यंत अनेक जण रिअल इस्टेटमध्ये (Real Estate) मोठ्या प्रमाणात गुंतवणूक करत...

By: Team Navakal
Amitabh Bachchan Property
Social + WhatsApp CTA

Amitabh Bachchan Property : आजकाल सामान्य गुंतवणूकदारांपासून ते बॉलिवूडमधील सेलिब्रिटींपर्यंत अनेक जण रिअल इस्टेटमध्ये (Real Estate) मोठ्या प्रमाणात गुंतवणूक करत आहेत. याच यादीत आघाडीवर आहेत बॉलीवूडचे महानायक अमिताभ बच्चन.

प्रॉपर्टी खरेदी आणि विक्रीमध्ये ते सक्रिय असल्याचे पुन्हा एकदा समोर आले आहे. नुकतेच त्यांनी मुंबईतील गोरेगाव येथील आपले दोन आलिशान फ्लॅट्स विकले असून, या व्यवहारातून त्यांना गेल्या 13 वर्षांत सुमारे 47% इतका मोठा नफा झाला आहे.

गोरेगावमधील फ्लॅट्सची विक्री

2012 मध्ये 8.12 कोटी रुपयांना खरेदी केलेले हे दोन्ही फ्लॅट्स गोरेगाव ईस्टमधील ओबेरॉय एक्सक्विझिट इमारतीच्या 47 व्या मजल्यावर होते. अमिताभ बच्चन यांनी हे फ्लॅट्स आता 12 कोटी रुपयांना विकले आहेत.

पहिला फ्लॅट 31 ऑक्टोबर 2025 रोजी आशा ईश्वर शुक्ला यांनी विकत घेतला. तर दुसरा फ्लॅट 1 नोव्हेंबर 2025 रोजी ममता सूरजदेव शुक्ला यांनी खरेदी केला. प्रत्येक फ्लॅटवर 30 लाख रुपयांची स्टॅम्प ड्युटी भरण्यात आली असून, या फ्लॅट्ससोबत प्रत्येकी दोन अशा एकूण चार कार पार्किंग जागांचा समावेश होता.

बच्चन कुटुंबाचे मोठे रिअल इस्टेट व्यवहार

बच्चन कुटुंब रिअल इस्टेटमध्ये सातत्याने मोठे व्यवहार करत आहे. याच वर्षी जानेवारी 2025 मध्ये अमिताभ बच्चन यांनी अंधेरी येथील ‘द अटलांटिस’ बिल्डिंगमधील 5,185 वर्ग फूट कार्पेट एरिया असलेले डुप्लेक्स अपार्टमेंट तब्बल 83 कोटी रुपयांना विकले होते.

दुसरीकडे, 2024 मध्ये अभिषेक बच्चन यांनी बोरीवलीतील ओबेरॉय स्काय सिटी प्रोजेक्टमध्ये 15.42 कोटी रुपयांचे सहा फ्लॅट्स खरेदी केले. तसेच, याच वर्षी अमिताभ आणि अभिषेक यांनी एकत्र मिळून मुलुंड वेस्टमध्ये ओबेरॉय इटर्निया प्रोजेक्टमध्ये 24.94 कोटी रुपये गुंतवून 10 फ्लॅट्स खरेदी केले होते.

याशिवाय, नुकतेच त्यांनी मुंबईजवळील अलीबाग येथे 6.59 कोटी रुपये किमतीचे एकूण 9,557 वर्ग फूट क्षेत्राचे तीन जमिनीचे तुकडे खरेदी केले आहेत. अमिताभ बच्चन यांच्या या यशस्वी व्यवहारांनी रिअल इस्टेट गुंतवणूक म्हणून किती फायदेशीर ठरू शकते, हे सिद्ध केले आहे.

हे देखील वाचा – Zohran Mamdani : न्यूयॉर्कच्या महापौरपदावर भारतीय वंशाची व्यक्ती; जाणून घ्या कोण आहेत जोहरान ममदानी?

Web Title:
संबंधित बातम्या