Anushka Sharma and Virat Kohli : भारतीय क्रिकेटपटू विराट कोहली आणि अभिनेत्री अनुष्का शर्मा पुन्हा एकदा आध्यात्मिक गुरु प्रेमानंद जी महाराजांना भेटण्यासाठी वृंदावनला पोहोचले. मंगळवारी श्री हित राधा केली कुंज आश्रमात दोघांनीही आशीर्वाद घेतले आणि महाराजांशी संवाद साधला. यादरम्यान प्रेमानंद महाराजांनी गुरु आणि देवतेचे महत्त्व देखील स्पष्ट केले. या वर्षी प्रेमानंद महाराजांशी विराट आणि अनुष्काची ही तिसरी भेट आहे. दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या अलिकडच्या एकदिवसीय मालिकेनंतर, विराट कोहली आणि त्यांच्या पत्नीने महाराजांच्या समाधीस्थळाचे दर्शन घेतले. दोघेही भावनिक आणि भक्तीत बुडालेले दिसले.
या संदर्भातला एक व्हिडिओ देखील सोशल मीडियावर जोरदार वायरल होताना दिसत आहे. विराट आणि अनुष्का साध्या कपड्यांमध्ये प्रेमानंद महाराजांसमोर बसलेले दिसतात. दोघांचीही भक्ती यामध्ये प्रकर्षाने दिसून येत आहे.
प्रेमानंद महाराजांनी त्यांना काही सल्ले देखील दिले आहेत. त्यांना त्यांचे काम देवाची सेवा मानण्याचा, नम्र राहण्याचा आणि देवाचे नाव जपण्याचा सल्ला दिला. यश मिळाले तरी देवप्राप्तीची इच्छा कायम ठेवण्याचा सल्ला त्यांनी दिला. कीर्ती मिळवल्यानंतरही देवाला प्राप्त करण्याची इच्छा कायम ठेवण्याचा सल्ला देखील त्यांनी दिला असल्याचे म्हटले जाते.
दरम्यान जानेवारी महिन्यात विराट आणि अनुष्का यांनी आपल्या दोन्ही मुलांसह वृंदावनमध्ये येत प्रेमानंद महाराजांचे दर्शन घेतले होते. त्यानंतर मे महिन्यात विराटने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती जाहीर केल्यानंतरही तो अनुष्कासोबत आश्रमात दर्शनासाठी पोहोचला होता. कुंज आश्रमात सुमारे १५ मिनिटे महाराजांशी संवाद साधला होता, तर एकूण अडीच तास ते आश्रमात थांबले होते.
हे देखील वाचा – Fake Murder : एक कोटीच्या पॉलिसीसाठी स्वतःच्याच बनावट खुनाचा थरार; एका अनोळखी व्यक्तीला ड्रायव्हिंग सीटवर बसवून लावली आग..









