Home / मनोरंजन / Aryan Khan : आर्यन खान पुन्हा एकदा वादाच्या भोवऱ्यात

Aryan Khan : आर्यन खान पुन्हा एकदा वादाच्या भोवऱ्यात

Aryan Khan : बॉलिवूड अभिनेता शाहरुख खानचा मुलगा आर्यन खान हा कायमच चर्चेत असतो. आणि आता पुन्हा एकदा तो वादात...

By: Team Navakal
Aryan Khan
Social + WhatsApp CTA

Aryan Khan : बॉलिवूड अभिनेता शाहरुख खानचा मुलगा आर्यन खान हा कायमच चर्चेत असतो. आणि आता पुन्हा एकदा तो वादात अडकला आहे. बंगळुरूमधील एका पबमधून बाहेर पडताना त्याने लोकांना मधलं बोट दाखवल्याचा व्हिडिओ सोशल मेडियावर चांगलाच व्हायरल होत आहे. आणि या व्हिडिओनंतर एका वकिलाने त्याच्याविरुद्ध अश्लील वर्तनाची तक्रार दाखल केली आहे.

आर्यन खान हा एका खाजगी पार्टीसाठी बेंगळुरूला गेला होता. अशोक नगर पोलीस स्टेशनजवळील पबमधून बाहेर येताना सुरुवातीला चाहत्यांना अभिवादन करणारा आर्यन अचानक मिडल फिंगर दाखवताना दिसला त्यामुळे अनेक चर्चा देखील रंगल्या. व्हिडिओमध्ये त्याच्यासोबत कन्नड अभिनेता झैद खान व काँग्रेस नेते मोहम्मद नालापद आणि काँग्रेसचे ज्येष्ठ आमदार एनए हरिस यांची मुलंही दिसत आहे.

आर्यनच्या आसपास अनेक राजकीय नेत्यांची मुले असल्याने ही घटना राजकीय पातळीवरही चांगलाच चर्चेचा विषय ठरली आहे. व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर पोलिसांनी पबमध्ये जाऊन चौकशी केली आहे. त्यानंतर आर्यन खानच्या मॅनेजरची विचारपूस करण्यात आली आहे. सोशल मीडियावर या घटनेची जोरदार चर्चा असून बऱ्याच नेटकाऱ्यानी यावर टीका देखील केली आहे.


हे देखील वाचा – The Family Man Season : ‘द फॅमिली मॅन ४’ मध्ये येणारं मोठा ट्विस्ट! चौथा भाग असणार अधिक मनोरंजक

Web Title:
For more updates: , , stay tuned with Navakal
संबंधित बातम्या