Best Indian Web Series 2025 : मनोरंजन विश्वात 2025 हे वर्ष अत्यंत खास ठरले. अनेक लोकप्रिय मालिकांचा नवा सीझन आणि काही दमदार कथा या वर्षी प्रेक्षकांना OTT माध्यमातून पाहायला मिळाल्या. IMDb ने नुकतीच या वर्षातील सर्वोत्तम भारतीय वेब मालिकांची यादी जाहीर केली आहे. यामध्ये ॲक्शन, थ्रिलर आणि विनोदी अशा विविध प्रकारच्या मालिकांचा समावेश आहे.
Netflix, Prime Video, JioHotstar आणि SonyLIV यांसारख्या विविध माध्यमांवर उपलब्ध असलेल्या टॉप 7 वेब मालिकांची माहिती खालीलप्रमाणे आहे.
1. क्रिमिनल जस्टिस: अ फॅमिली मॅटर (JioHotstar)
‘क्रिमिनल जस्टिस: अ फॅमिली मॅटर’ ही हिंदी भाषेतील एक प्रभावी ड्रामा सीरिज आहे. रोहन सिप्पी दिग्दर्शित या मालिकेची कथा एका कुटुंबावर आधारित आहे, जी न्याय प्रणालीची गुंतागुंत दाखवते. पंकज त्रिपाठी, मोहम्मद झीशान अय्यूब आणि सुरवीन चावला या कलाकारांनी या मालिकेत मुख्य भूमिका साकारल्या आहेत.
2. पंचायत 4 (Prime Video)
सर्वांची आवडती आणि ग्रामीण पार्श्वभूमीवर आधारित असलेली ‘पंचायत’ ही मालिका Prime Video वर चौथ्या सीझनमध्ये परतली आहे. जितेंद्र कुमार, नीना गुप्ता, रघुबीर यादव यांच्यासारख्या लोकप्रिय कलाकारांमुळे ही मालिका पुन्हा एकदा चर्चेत आहे. या सीझनचे चित्रीकरण प्रामुख्याने मध्यप्रदेशातील महोदिया गावात करण्यात आले आहे.
3. द हंट: द राजीव गांधी असॅसिनेशन केस (SonyLIV)
‘द हंट: द राजीव गांधी असॅसिनेशन केस’ ही SonyLIV वर प्रदर्शित झालेली हिंदी भाषेतील क्राइम थ्रिलर मालिका आहे. नागेश कुकनूर दिग्दर्शित या मालिकेत राजीव गांधींच्या मारेकऱ्यांचा शोध घेण्यात आला आहे. ही मालिका अनिरुद्ध मित्रा यांच्या ‘नाईंटी डेज’ या पुस्तकावर आधारित आहे.
4. द फॅमिली मॅन 3 (Prime Video)
मनोज वाजपेयी यांची बहुप्रतिक्षित ‘द फॅमिली मॅन’ या मालिकेचा सीझन 3 देखील 2025 मध्ये आला. या मालिकेत पूर्वोत्तर भारताशी संबंधित भू-राजकीय विषयांवर लक्ष केंद्रित केले आहे.
5. द बार्ड्स ऑफ बॉलिवूड (Netflix)
आर्यन खान दिग्दर्शित ‘द बा***र्ड्स ऑफ बॉलिवूड’ ही मालिका Netflix वर हिट झाली आणि अनेक आठवडे ट्रेंडिंग होती. बॉलिवूडच्या जगात एका महत्त्वाकांक्षी बाहेरील व्यक्तीच्या प्रवासाची कथा यात मनोरंजक पद्धतीने दाखवण्यात आली आहे. यात बॉबी देओल, लक्ष्य लालवानी आणि मोना सिंग यांच्यासह अनेक कलाकारांच्या महत्त्वपूर्ण भूमिका आहेत.
6. स्पेशल ऑप्स 2 (JioHotstar)
रिसर्च अँड ॲनालिसिस विंग (RAW) एजंट हिम्मत सिंगच्या भूमिकेत के के मेनन यांची ‘स्पेशल ऑप्स’चा सीझन २ देखील JioHotstar वर स्ट्रीम होत आहे. भारतातील दहशतवादी हल्ल्यांचा सूत्रधार शोधण्यासाठी हिम्मत सिंग एका खास टीमची स्थापना करतो, अशी या मालिकेची कथा आहे.
7. बकैती (Bakaiti)
‘बकैती’ ही अमित गुप्ता दिग्दर्शित हिंदी भाषेतील विनोदी-ड्रामा सीरिज आहे. शीबा चड्ढा आणि राजेश तैलंग यांच्या मुख्य भूमिका असलेल्या या मालिकेची कथा गाझियाबादमध्ये एका मध्यमवर्गीय कुटुंबाभोवती फिरते, जे आर्थिक तणाव आणि कौटुंबिक समस्यांचा सामना करत आहेत.









