Bigg Boss 19 Contestants List: बहुप्रतिक्षित रिॲलिटी शो ‘बिग बॉस 19’ (Bigg Boss 19) चे नवीन पर्व सुरू झाले आहे. नुकतेच, याचा ग्रँड प्रीमियर (Grand Premiere) पार पडला. सुपरस्टार सलमान खान (Salman Khan) होस्ट म्हणून परतला असून, यंदा ‘घरवाल्यांची सरकार’ (Gharwalon Ki Sarkar) ही खास थीम आहे.
एकूण 16 स्पर्धकांनी बिग बॉसच्या घरात प्रवेश केला आहे. यंदा प्रत्येक एपिसोड टीव्हीवर येण्याआधी डिजिटल प्लॅटफॉर्मवर स्ट्रीम होणार आहे, ज्यामुळे प्रेक्षकांना शोचा अनुभव लवकर घेता येईल.
‘बिग बॉस’चा आवाज यंदा कमी ऐकू येणार असून, घरवाल्यांनाच जास्त अधिकार आणि जबाबदाऱ्या देण्यात आल्या आहेत. पण जेव्हा गरज वाटेल, तेव्हा बिग बॉस स्पर्धकांसाठी नवनवीन ट्विस्ट घेऊन येणार आहे.
हे आहेत बिग बॉस 19 चे 16 स्पर्धक (Bigg Boss 19 Contestants List)
- अशनूर कौर (Ashnoor Kaur): ‘ये रिश्ता क्या कहलाता है’ फेम टीव्ही अभिनेत्री.
- झैशान काद्री (Zeishan Quadri): ‘गँग्स ऑफ वासेपूर’ फेम लेखक आणि अभिनेता.
- तान्या मित्तल (Tanya Mittal): स्पिरिच्युअल इन्फ्लूएन्सर आणि मोटिव्हेशनल स्पीकर.
- अवेझ दरबार (Awez Darbar): प्रसिद्ध सोशल मीडिया स्टार आणि डान्सर.
- नगमा मिराजकर (Nagma Mirajkar): सोशल मीडिया इन्फ्लूएन्सर आणि अवेझ दरबारची मैत्रिण.
- नेहल चुडासमा (Nehal Chudasama): 2018 ची ‘मिस दिवा युनिव्हर्स’.
- बसीर अली (Baseer Ali): ‘रोडीज’ आणि ‘स्प्लिट्सव्हिला’ सारख्या रिॲलिटी शोचा अनुभवी स्पर्धक.
- अभिषेक बजाज (Abhishek Bajaj): ‘स्टुडंट ऑफ द इयर 2’ फेम अभिनेता.
- गौरव खन्ना (Gaurav Khanna): ‘अनुपमा’ फेम टीव्ही स्टार.
- नतालिया जानोस्झेक (Natalia Janoszek): ‘वॉर 2’ आणि ‘हाऊसफुल 5’ मध्ये दिसलेली पोलिश अभिनेत्री.
- प्रणीत मोरे (Pranit More): मुंबईचा स्टँड-अप कॉमेडियन.
- फरहाना भट (Farrhana Bhatt): अभिनेत्री आणि तायक्वांदो चॅम्पियन.
- नीलम गिरी (Neelam Giri): भोजपुरी सिनेमातील लोकप्रिय अभिनेत्री.
- कुनिका सदानंद (Kunickaa Sadanand): बॉलिवूडमधील ज्येष्ठ अभिनेत्री.
- मृदुल तिवारी (Mridul Tiwari): लोकप्रिय YouTuber आणि ‘फॅन्स का फैसला’ या सेगमेंटचा विजेता.
- अमाल मलिक (Amaal Mallik): प्रसिद्ध गायक आणि संगीतकार.
या पर्वात ड्रामा, मनोरंजन आणि अनपेक्षित ट्विस्ट भरभरून असणार आहेत, अशी चाहत्यांची अपेक्षा आहे.
कार्यक्रमाची वेळ: यंदा JioHotstar वर रात्री 9:00 वाजल्यापासून हा शो पाहता येईल. तर Colors TV वर रात्री 10:30 वाजल्यापासून हा शो पाहता येणार आहे.
हे देखील वाचा –
’10 ते 15 लाख रुपये घेऊन…’; लक्ष्मण हाकेंचा मनोज जरांगेंवर ‘फंडिंग’चा आरोप
मंदिरांतील राजकारणावर केरळ हायकोर्टाची बंदी
9 कॅरेट सोने नक्की काय आहे? किंमत-शुद्धेपर्यंत जाणून घ्या संपूर्ण माहिती