Bigg Boss 19 Eviction : वादग्रस्त शो असणाऱ्या ‘बिग बॉस १९’च्या ग्रँड फिनालेचं काऊंटडाउन आता सुरू झालं आहे. येत्या ७ डिसेंबरला या सीझनचा ग्रँड फिनाले पार पडणार आहे. त्याआधी ‘टॉप-५’ स्पर्धक कोण आहेत याबद्दल सोशल मीडियावर अनेक तर्क वितर्क सुरु आहेत. तसंच या आठवड्याच्या मध्ये कोण घराबाहेर जाणार याचीही जोरदार चर्चा आहे.
‘बिग बॉस’च्या मागच्या आठवड्यात शहबाज बदेशा आणि अशनूर कौर शोमधून बाहेर पडले, त्यामुळे आता घरात फक्त ६ स्पर्धकच बाकी आहेत. यापैकी गौरव खन्नाला तिकीट टू फिनाले मिळाल्यामुळे तो थेट महाअंतिम फेरीत पोहोचला आहे. तसंच या आठवड्याच्या नॉमिनेशनच्या प्रक्रियेतही तो कॅप्टन असल्यामुळे देखील आणि तिकीट टू फिनाले मिळाल्यामुळे सुद्धा सुरक्षित आहे.
गौरवला सोडून आता अमाल मलिक, मालती चाहर, तान्या मित्तल, प्रणित मोरे आणि फरहाना भट्ट ह्यांच्यामध्ये अंतिम फेरीत पोहोचण्यासाठी हि स्पर्धा सुरु आहे. अशातच काही रिपोर्ट्सनुसार, येत्या मिड-वीक एव्हिक्शनमध्ये अमाल, तान्या, मालती, प्रणित आणि फरहाना यांपैकी एक जण घराबाहेर जाणार अश्या चर्चा होत्या. मात्र आता नुकत्याच मिळालेल्या माहिती नुसार मालती चहर फिनालेपासून वंचित राहिली आहे. या आठवड्यात कमी वोट मिळाल्यामुळे मालती चहर ‘बिग बॉस १९ च्या घरातून बेघर झाली आहे. या चर्चानमध्ये किती तथ्यता आहे हे येत्या काहि भागात समजेलच. पॉप्युलॅरिटी रँकिंगमध्ये वाइल्ड कार्ड स्पर्धक मालती चहर हि मागे होती. मिड-वीक एव्हिक्शनबद्दल ‘बिग बॉस’च्या घरात बुधवारी घोषणा केली जाण्याची शक्यता आहे.
हे देखील वाचा – Samantha – Raj Wedding : भूत शुद्धी विवाह म्हणजे काय? समांथा आणि राजच्या लग्नाची योगिक परंपरा चर्चेत









