Suraj Chavan New Home : ‘बिग बॉस मराठी’च्या (Bigg Boss Marathi) पाचव्या पर्वाचा विजेता सूरज चव्हाण सध्या त्याच्या आयुष्यातील सर्वात मोठ्या टप्प्यातून जात आहे. अत्यंत हालाखीच्या परिस्थितीतून संघर्ष करून प्रसिद्ध झालेल्या या ‘गुलिगत स्टारने’ नुकताच आपल्या नव्या, भव्य आणि आलिशान घरात गृहप्रवेश केला आहे.
मूळचा बारामती तालुक्यातील मोढवे गावातील असलेला सूरज लग्नापूर्वी आपल्या हक्काच्या वास्तूमध्ये स्थायिक झाला आहे.
अजित पवारांच्या शब्दाने स्वप्न झाले सत्य
सूरज चव्हाणची आर्थिक परिस्थिती बेताची होती आणि त्याला स्वतःचे घर नव्हते. ‘बिग बॉस’ जिंकल्यानंतर त्याने उपमुख्यमंत्री अजित पवार यांची भेट घेतली, तेव्हा दादांनी त्याला घर बांधून देण्याची घोषणा केली होती. अजित पवारांनी दिलेला शब्द पाळला असून, त्यांनी वेळोवेळी कामाचा आढावा घेतला. याच पाठिंब्यामुळे सूरजचे दुमजली घर एका वर्षाच्या आत तयार झाले. नुकतेच सूरजने बहिणींसोबत या घरात प्रवेश केला.
बंगल्याचा आधुनिक आणि आलिशान लूक
सूरजने सोशल मीडियावर गृहप्रवेशाचा व्हिडीओ शेअर केला आहे, ज्यामध्ये त्याच्या घराचा आधुनिक आणि आकर्षक लूक स्पष्ट दिसतो. या बंगल्यामध्ये मोठे खिडक्या, चकचकीत फरशी, हाय-सीलिंग असलेला प्रशस्त दिवाणखाना, तसेच आधुनिक सुविधांनी सुसज्ज असे स्वयंपाकघर आहे. संपूर्ण घराचे इंटिरियर अत्यंत विचारपूर्वक केलेले असून, ही वास्तू सूरजच्या यशाची नवी ओळख बनली आहे.
लग्नाची जोड आणि तयारीची लगबग
घराचे स्वप्न पूर्ण झाल्यावर आता सूरज चव्हाणच्या आयुष्यात लग्नाची लगबग सुरू झाली आहे. सूरज आणि त्याची भावी पत्नी संजना हे 29 नोव्हेंबरला विवाहबंधनात अडकणार आहेत. 28 नोव्हेंबरपासून लग्नविधींना सुरुवात होईल. पुण्याजवळच्या सासवड येथे हा लग्नसोहळा पार पडणार आहे, ज्यासाठी दोन्ही कुटुंबीय तयारीमध्ये गुंतले आहेत. सूरजने या सोहळ्यासाठी अजित पवारांनाही आमंत्रित केले आहे.
हे देखील वाचा – Smart TV Buying Guide : नवीन स्मार्ट टीव्ही खरेदी करताय? हे 5 अत्यावश्यक फीचर्स नक्की तपासा; अन्यथा होईल नुकसान









