पॅलेस्टाईन-गाझाच्या समर्थनार्थ अभिनेत्री स्वरा भास्करची पोस्ट ! नेटकऱ्यांकडून टीका

Bollywood actress Swara Bhaskar tweet

मुंबई – बॉलिवूड अभिनेत्री स्वरा भास्कर (Bollywood actress Swara Bhaskar )पुन्हा एकदा वादाच्या भोवऱ्यात सापडली आहे. पॅलेस्टाईन आणि गाझाच्या समर्थनार्थ एकता रॅलीचे (support of Palestine)पोस्टर शेअर करून तिने मुंबईतील लोकांना रॅलीमध्ये सामील होण्याचे आवाहन केले. या पोस्टमुळे तिच्यावर सध्या नेटकऱ्यांनी तिच्यावर टीकेची झोड उठवली आहे. अनेकांनी तिला भारत सोडण्याचा (leave India) सल्लाही दिला.

स्वरा भास्करने आपल्या पोस्टमध्ये (ex account) म्हटले की, पॅलेस्टाईन आणि गाझाच्या समर्थनार्थ एकता रॅलीचे आयोजन करण्यात आले आहे. ही रॅली आझाद मैदानात होणार आहे (rally in support of Palestine), जी सीपीआय, सीपीआय एमएल आणि समाजवादी पक्षासारख्या राजकीय पक्षांनी आयोजित केली आहे. मुंबईतील नागरिकांनी या रॅलीत सहभागी व्हावे.

स्वराच्या या पोस्टवर नेटकऱ्यांनी कमेंट करत तिला पहलगाम हल्ला आणि ऑपरेशन सिंदूर आठवून देत तू त्यावर गप्प का? असा सवाल केला. आणखी एका नेटकऱ्याने लिहिले की, पहलगाम, बांगलादेशी हिंदू, सुदानचे ख्रिश्चन, सीरियाचे ख्रिश्चन, पाकिस्तानमधील हिंदू आणि ख्रिश्चन बाजूला ठेवून, तिला त्यांचीच काळजी वाटते. स्वरा भास्कर पॅलेस्टाईनला का जात नाही? असाही प्रश्न काही नेटकऱ्यांनी विचारला. स्वराने याआधीही आंतरराष्ट्रीय विषयावर मत मांडली आहेत. त्यावरूही तिला ट्रोल करण्यात आले होते.