Manache Shlok – अभिनेत्री मृण्मयी देशपांडे (Actress Mrunmayee Deshpande)दिग्दर्शित ‘मनाचे श्लोक’ या आगामी मराठी चित्रपटावर वाद (Controversy)निर्माण झाला आहे. १० ऑक्टोबर रोजी प्रदर्शित होणाऱ्या या चित्रपटाच्या नावावरून श्री समर्थ सेवा मंडळाने (Shri Samarth Seva Mandal)आक्षेप घेतला. त्यांनी चित्रपटाचा ट्रेलर हटवण्याची आणि नाव बदलण्याची मागणी केली आहे.
मनाचे श्लोक हा संत रामदासस्वामी यांनी रचलेला पवित्र ग्रंथ आहे. या ग्रंथाच्या नावाचा वापर विनोदी व भावनिक कथानक असलेल्या चित्रपटासाठी करण्यात आल्यामुळे समर्थ भक्त आक्रमक झाले आहेत. श्रीसमर्थ सेवा मंडळ, सज्जनगडच्या ट्रस्टी प्रवीण कुलकर्णी (Sajjangad trustee Pravin Kulkarni ) यांनी यासंदर्भात प्रतिक्रिया देताना सांगितले की, चित्रपटाचे नाव तत्काळ बदलावे अन्यथा समर्थ भक्तांच्या रोषाला सामोरे जावे लागेल.
ट्रेलरही (Trailer) सोशल मीडियावरून हटवण्याच यावा. पवित्र हिंदू विवाह संस्था (Hindu Marriage) आणि रामदासी सांप्रदायाच्या (Ramdasi tradition) मूल्यांचा विपर्यास करत चुकीचे तत्त्वज्ञान जनमानसावर थोपवण्याचा प्रयत्न या चित्रपटातून केला जात आहे. त्यामुळे मनाचे श्लोक या नावाचा वापर चित्रपटासाठी करणे अयोग्य आहे.
चित्रपटाच्या ट्रेलरमध्ये श्लोक आणि मनवा या पात्रांची केमिस्ट्री, त्यांच्या घरच्यांची लग्नासाठीची धावपळ आणि स्थळ बघण्यातील गमतीजमती दाखवल्या आहेत. कथानक विनोदी आणि भावनिक स्वरूपाचे असले तरी चित्रपटाच्या शीर्षकामुळे धार्मिक भावना दुखावल्या गेल्याचा आरोप होत आहे.
हे देखील वाचा –
भारताचा स्वदेशी मेसेजिंग ॲप आराटाई; व्हॉट्सॲपला टक्कर देणारा नवा पर्याय
बिहार विधानसभा निवडणूक दोन टप्प्यांत ! 6, 11 नोव्हेंबरला मतदान! 14 ला निकाल
राजेशाही पदव्यांचा उल्लेख करू नका; जयपूर घराण्याला कोर्टाचा आदेश