दादासाहेब फाळकेंची कथा मोठ्या पडद्यावर! आमिर खान राजकुमार हिरानी घेऊन येत आहेत ऐतिहासिक बायोपिक

Dadasaheb Phalke Biopic

Dadasaheb Phalke Biopic | भारतीय चित्रपटसृष्टीचे जनक मानले जाणारे दादासाहेब फाळके (Dadasaheb Phalke) यांच्यावर अखेर मोठा चित्रपट येत आहे. हिंदी सिनेमात आजपर्यंत या दिग्गजाची कथा मोठ्या पडद्यावर साकारली गेली नव्हती, पण आता राजकुमार हिरानी (Rajkumar Hirani) आणि आमिर खान (Aamir Khan) यांची पुन्हा एकदा जोडी जमली आहे.

आमिर खान हा या चित्रपटात प्रमुख भूमिकेत दिसण्याची शक्यता आहे. या चित्रपटाचे शूटिंग ऑक्टोबर 2025 पासून सुरू होणार आहे.

दादासाहेब फाळकेंची ही कथा भारतीय स्वातंत्र्यलढ्याच्या काळात एका कलाकाराने शून्यातून केलेल्या प्रयत्नांची आहे. त्यांनी स्वदेशी चित्रपट उद्योगाची पायाभरणी केली, ज्याचा प्रभाव आज जगभरच्या भारतीय सिनेमावर आहे. त्यांचा जीवनप्रवास प्रत्येक भारतीयाने पाहावा असा आहे.

या चित्रपटाच्या तयारीसाठी लॉस एंजेलिसमधील एक नामवंत व्हीएफएक्स स्टुडिओने एआय तंत्रज्ञानाच्या मदतीने फाळकेंच्या काळाचा अनुभव जिवंत करण्याची तयारी केली आहे.

हिरानींसह अभिजात जोशी, हिंदुकुश भारद्वाज आणि अविष्कार भारद्वाज ( गेल्या 4 वर्षांपासून या चित्रपटाच्या स्क्रिप्टवर काम करत आहेत. विशेष म्हणजे, दादासाहेब फाळकेंचे नातू चंद्रशेखर श्रीकृष्ण पुसालकर यांनीही या प्रकल्पाला सक्रिय पाठिंबा दिला आहे.

सध्या आमिर खान ‘सितारे जमीन पर’ (Sitare Zameen Par) मध्ये झळकणार असून, तो चित्रपट 20 जून रोजी प्रदर्शित होणार आहे. त्यानंतर तो फाळकेंच्या भूमिकेच्या तयारीला सुरुवात करतील.

दरम्यान, हिरानी-आमिर जोडीने यापूर्वी ‘3 इडियट्स’ (3 Idiots) आणि ‘पीके’ (PK) सारखे कल्ट क्लासिक्स (Cult Classics) चित्रपट दिले आहेत. त्यामुळे हा आगामी चित्रपट भारतीय मनोरंजन उद्योगात नवा इतिहास रचू शकतो, अशी अपेक्षा आहे.