Deepika Padukone: प्रसिद्ध अभिनेत्रींनपैकी एक बॉलिवूड अभिनेत्री दीपिका (Deepika Padukone) दुकोण पुन्हा एकदा वादाच्या भोवऱ्यात सापडली आहे. सोशल मीडियावरील नव्या जाहिरातीतील(Advertisement) पोषाखामुळे तिच्यावर टिकेची झोड उठवली आहे. अबुधाबीत करण्यात आलेल्या एका नव्या जाहिरातीसाठी तिने हिजाब परिधान केल्याने ती सोशल मीडियावर (Social Media)चांगलीच ट्रॉल होते आहे.
दीपिका आणि रणवीर सिंहने अबुधाबीच्या संस्कृती आणि पर्यटन विभागासाठी जाहिरातीचे चित्रीकरण केले आहे, या चित्रीकरणामध्ये दीपिका शेख झायेद ग्रँड मशिदीप्रती आदर व्यक्त करताना दिसते. तिने मरून रंगाचा हिजाब परिधान केला असून रणवीर काळ्या रंगाच्या ब्लेझरमध्ये दिसतो आहे. या जाहिरातीचा व्हिडिओ रणवीरने सोशल मीडियावर शेयर केला आहे. यात त्याने मेरा सुकून असा कॅपशन देत हॅशटॅग अबुधाबी असे लिहिले आहे.

या जाहिरातीवरून नेटिझन्समध्ये तीव्र अश्या प्रतिक्रिया उमटल्या आहेत. काहींनी तिच्या या पोशाखाचं कौतुक देखील केल आहे; तर काहींनी त्यावर तिला ट्रोल करण्यास सुरुवात केली आहे. ‘दीपिका आणि रणवीर ज्या उत्साहाने आणि आनंदाने परदेशी संस्कृतीच प्रमोशन करतात, तेवढाच उत्साह त्यांनी भारताच्या संस्कृतीला प्रमोट करण्यात दाखवला, तर बरं होईल’,अशी कंमेंट एकाने केली आहे. दीपिका पदुकोण कपड्यांवरून ट्रोल होणे ही पहिली वेळ नाही. यापूर्वी पठाण चित्रपटातील भगव्या रंगाच्या बिकिनीमुळेही ती चर्चेत आली होती.
हे देखील वाचा –