Deepika Padukone: तब्बल 190 कोटी वेळा पाहण्यात आला दीपिका पदुकोणचा ‘हा’ व्हिडिओ, रोनाल्डोलाही टाकले मागे

Deepika Padukone Viral Instagram Reel

Deepika Padukone Viral Instagram Reel: अभिनेत्री दीपिका पदुकोणने (Deepika Padukone) बॉलिवूडसह हॉलिवूडमध्ये स्वतःचे एक वेगळे स्थान निर्माण केले आहे. दीपिकाचे इंस्टाग्रामवर 80 मिलियनपेक्षा अधिक फॉलोअर्स आहेत. त्यामुळे तिच्या प्रत्येक व्हिडिओला लाखो व्ह्यूज असतात. आता तिच्या एका रीलने (Deepika Padukone Viral Instagram Reel) मोठा रेकॉर्ड केला आहे.

दीपिकाच्या एका इंस्टाग्राम रीलला तब्बल 1.9 अब्ज (1.9 billion) पेक्षा जास्त व्ह्यूज मिळाले आहेत. विशेष म्हणजे तिने ख्रिस्तियानो रोनाल्डो (Cristiano Ronaldo) आणि नीरज चोप्रा (Neeraj Chopra) यांसारख्या दिग्गजांनाही मागे टाकले आहे.

दीपिका पदुकोणचा सर्वात जास्त पाहिला गेलेला व्हिडिओ

अभिनेत्री दीपिका पदुकोणची एका हॉटेलची जाहिरातआता इंस्टाग्रामवर सर्वाधिक पाहिली गेलेली व्हिडिओ ठरली आहे. या व्हिडिओला तब्बल 1.9 अब्ज (1.9 billion) पेक्षा जास्त व्ह्यूज मिळाले आहेत, ज्यामुळे डिजिटल जगात तिचे वर्चस्व सिद्ध झाले आहे.

ही जाहिरात तिच्या मूळ शहर असलेल्या बंगळूरूमध्ये चित्रित करण्यात आली होती. यामध्ये दीपिकाने हिल्टन हॉटेलची (Hilton Hotel) जाहिरात केली आहे. हिल्टन ग्रुप 2025 मध्ये बंगळूरू, सूरत, जबलपूर, हैदराबाद आणि मुंबई येथे नवीन हॉटेल्स सुरू करत आहे. यासंदर्भात कंपनीने नवीन जाहिरात केली आहे.

व्हिडिओने मोडले रेकॉर्ड

सध्याच्या आकडेवारीनुसार, दीपिकाच्या या व्हिडिओने अनेक रेकॉर्ड मोडले आहेत आणि तो इंस्टाग्रामवर सर्वाधिक पाहिलेल्या व्हिडिओंपैकी एक बनला आहे. या व्हिडिओने हार्दिक पांड्याच्या BGMI व्हिडिओलाही मागे टाकले आहे, ज्याला 1.6 अब्ज व्ह्यूज मिळाले होते.

तसेच, या व्हिडिओने नीरज चोप्राच्या BGMI जाहिरातीला (407 दशलक्ष व्ह्यूज), ख्रिस्तियानो रोनाल्डोच्या व्हिडिओला (ज्यात तो फिनलंडच्या उणे 20°C तापमानात बर्फाळ पाण्यात उतरला होता) आणि तिचा पती आणि अभिनेता रणवीर सिंग (Ranveer Singh) याच्या व्हिडिओलाही मागे टाकले आहे. रणवीरच्या व्हिडिओला 877 दशलक्ष व्ह्यूज मिळाले होते.

दीपिकाचे आगामी चित्रपट

दीपिकाच्या आगामी चित्रपटांबद्दल बोलायचे झाल्यास, ती लवकरच दिग्दर्शक एटलीच्चियात्रपटात दिसणार आहे. या चित्रपटाचे तात्पुरते नाव AA22xA6 असे आहे आणि यात अल्लू अर्जुन (Allu Arjun) मुख्य भूमिकेत आहे. याशिवाय, ती शाहरुख खानच्या ‘किंग’ या चित्रपटातही दिसणार आहे. या चित्रपटात ती शाहरुखची मुलगी सुहाना खानच्या आईच्या भूमिकेत दिसण्याची शक्यता आहे.