Deepika Padukone: अभिनेत्री दीपिका पादुकोण गेल्या काही दिवसांपासून चर्चेत आहे. दीपिकाने ‘कल्की 2898 AD’ च्या सिक्वेलमधून बाहेर पडण्याचा निर्णय घेतला होता. हा बिग बजेट चित्रपट हातातून गेल्यानंतर आता तिने शाहरूख खान सोबतचा एक फोटो सोशल मीडियावर शेअर केला आहे.
हा फोटो शेअर करत 18 वर्षांपूर्वी शाहरूखने दिलेल्या शिकवणीचा देखील तिने उल्लेख केला. दीपिकाने शाहरूख खानच्या आगामी ‘किंग’ चित्रपटाच्या सेटवरील फोटो शेअर केला आहे.
शाहरूख खानने 18 वर्षांपूर्वी दिलेली ‘ती’ शिकवण
दीपिकाने शेअर केलेल्या फोटोमध्ये ती शाहरूख खानचा हात धरून बसलेली दिसत आहे. तिने पोस्टमध्ये लिहिले, “18 वर्षांपूर्वी ‘ओम शांती ओम’च्या (Om Shanti Om) शूटिंगदरम्यान शाहरूखने मला पहिला धडा शिकवला होता, तो म्हणजे चित्रपटाचे यश महत्त्वाचे नाही, तर चित्रपट बनवण्याचा अनुभव आणि तुमच्यासोबत काम करणारी माणसे महत्त्वाची असतात.”
दीपिकाने पुढे लिहिले, “मी त्यांच्या या मताशी पूर्ण सहमत आहे आणि तेव्हापासून प्रत्येक निर्णयात मी हेच शिकले आहे. कदाचित यामुळेच आम्ही सहाव्यांदा एकत्र काम करत आहोत.” तिच्या या पोस्टवर पती रणवीर सिंगने (Ranveer Singh) ‘बेस्टेस्ट बेस्टीज’ अशी कमेंट केली आहे. ‘ ‘कल्की 2898 AD’ मधून बाहेर पडल्यानंतर तिने ही पोस्ट केली आहे. त्यामुळे या पोस्टचा त्याच्याशी संबंध जोडला जात आहे.
दरम्यान, दोन्ही कलाकारांनी ओम शांती ओम’ व्यतिरिक्त ‘चेन्नई एक्सप्रेस’, ‘हॅपी न्यू इयर’, ‘पठाण’ आणि ‘जवान’ सारख्या यशस्वी चित्रपटांमध्येही एकत्र काम केले आहे.
‘कल्की 2898 AD’ मधून बाहेर पडण्याचे कारण
दीपिका पादुकोण ‘किंग’ चित्रपटाचे शूटिंग करत असतानाच, काही दिवसांपूर्वी ‘व्यजयंती मुव्हीज’ने ती ‘कल्की 2898 AD’ च्या सिक्वेलचा भाग नसणार असल्याचे जाहीर केले होते. निर्मात्यांनी दिलेल्या निवेदनात म्हटले होते की, ‘कल्की’सारख्या चित्रपटासाठी कमिटमेंट आवश्यक आहे, जी त्यांना मिळू शकली नाही. ‘कल्की 2898 AD’ या चित्रपटाने जगभरात सुमारे 1100 कोटींचा गल्ला जमवला होता.
‘किंग’ चित्रपटाबद्दल
सिद्धार्थ आनंद दिग्दर्शित ‘किंग’ चित्रपटात शाहरूख आणि दीपिका व्यतिरिक्त सुहाना खान, जॅकी श्रॉफ, अनिल कपूर, अर्शद वारसी, राणी मुखर्जी, अभिषेक बच्चन, जयदीप अहलावत आणि अभय वर्मा यांसारखे दिग्गज कलाकार आहेत.
हे देखील वाचा – ‘ऑपरेशन सिंदूर’ 4 दिवसांत का थांबवले? हवाई दल प्रमुख ए.पी. सिंग यांनी सांगितले मोठे कारण